पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार २ जुलै ते सोमवार ११ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव व विश्वस्तांनी केले.
सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. शनिवारी २ जुलैला सकाळी ७.३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. शनिवार २ जुलैला महिमानगड, रविवार ३ जुलै लोधावडे फाटा, सोमवार ४ जुलै म्हसवड, मंगळवार ५ जुलै पिलीव, बुधवार ६ जुलै भाळवणी, गुरुवार ७ जुलै उपरी, शुक्रवार ८ जुलै वाखरी, शनिवार ९ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. रविवार 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. दिंडी सोहळ्यादरम्यान ठीकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, हरिपाठ, दैनंदिन आरतीचा कार्यक्रम होणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे भाविकांना पालखी सोहळ्याचा अनुभव घेता आला नाही. त्यानंतर दोन वर्षांनी आषाढी पालखी सोहळा होणार असल्याने सेवागिरी ट्रस्टने पायी पालखी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. विश्वस्तांनी दिंडीच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागांची पाहणी करून उत्तमोत्तम नियोजन केले आहे. पुसेगाव व पंचक्रोशीतील वारकरी मंडळाने या पायी पालखी दिंडीचे संयोजन केले आहे. दिंडीसाठी बाळकृष्ण नाथा जाधव व दिलीप मारुती जाधव यांनी बैलजोडी उपलब्ध करून दिली आहे.
ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबुंची सोय करण्यात आली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयिंसुविधायुक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्ट मार्फत करण्यात आली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसठी ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |