पुसेगाव: विवाह व अन्य समारंभात प्रशासनाने आणलेल्या निर्बंधांमुळे केटरर्स व्यवसाय धोक्यात आला असून त्यावर अवलंबून असलेल्या हजारो स्त्री-पुरुष मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या समस्येवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी खटाव व माण तालुक्यातील केटरर्स व्यावसायिकांची पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातील हॉटेल राजपुरोहित अॅड बालाजी केटरर्स येथे गुरुवारी (ता.25) संध्याकाळी चार वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनचे नारायणशेठ राजपुरोहित यांनी सांगितले.
खटाव व माण तालुक्यातील अनेकजण केटरर्स व्यवसाय करत आहेत. अनेक तरुण शासनाच्या योजनेतून प्रशिक्षण घेऊन केटरींगचा व्यवसाय करत आहेत. पण कोरोना प्रसार रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने आणलेल्या अनेक जाचक निर्बंधामुळे केटरर्स व्यवसाय अडचणीत आला आहे. कोणत्याही विवाह समारंभात 50 पेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येत नाही व त्यापेक्षा कमी लोकांच्या भोजनाच्या ऑर्डर्स घेणे केटरर्स व्यावसायिकांना परवडत नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणार्या कुटुंबांना सध्या मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व केटरर्सकडे हजारो स्त्री-पुरुष मजूर कष्ट करून आपली उपजीविका करत असतात. आर्थिक दुर्बलतेमुळे मजुरी करून कुटूंबाचे पालनपोषण करणार्या महिलांची संख्या केटरर्स व्यवसायात मोठी आहे. पण गेल्या वर्षभरात केटरर्स व्यवसाय धोक्यात आल्यामुळे या कष्टकरी स्त्री पुरुष मजूर व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे. हॉटेल व्यावसायिकांना क्षमतेच्या 50 ग्राहकांसाठी परवानगी आहे. त्याप्रमाणे कार्यालयाच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना विवाह सोहळ्यासाठी उपस्थितीची परवानगी मिळावी, असे नमूद करुन राजपुरोहित म्हणाले की, केटरर्स व्यावसायिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी विचारविनिमय या बैठकीत करण्यात येणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |