सातारा : दोनच दिवसांपूर्वी मायणी येथे पिस्तूलाचा धाक दाखवून ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला होता. अजून पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत, तोपर्यंतच हिवरवाडी येथील ऍड. पी. डी. सावंत यांच्याच घराला चोरट्यांनी टार्गेट केले. चोरट्यांनी वकिलाचे बंद घर फोडून जवळपास सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
या घटनेची फिर्याद स्वतः ऍड. पी. डी. सावंत यांनी मायणी पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऍड. सावंत यांचे आई व वडील हे दोघेही हिवरवाडी येथे वास्तव्यास असतात, तर स्वतः सावंत व त्यांचे बंधू असे एकत्र व्यवसायासाठी वडूज येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात ऍड. सावंत यांच्या वडिलांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांचे कुटुंब सध्या वडूज येथे वास्तव्यास होते.
काल ऍड. सावंत व आई सकाळी हिवरवाडी येथे आले होते. दिवसभर शेतातील कामे करून संध्याकाळी ते परत वडुजला गेले. सकाळी त्यांच्या चुलत बंधूंनी त्यांना फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ऍड. सावंत यांनी तत्काळ हिवरवाडी येथे येऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मायणी येथील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक पालेकर यांनी पाहणी करून या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. संध्याकाळी 5 वाजता श्वान पथक आले व कण्हरवाडी कडे गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालेकर करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |