08:51pm | May 13, 2022 |
सातारा : हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हरिहरेश्वर सहकारी बँकेत ३७ कोटी ४६ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला. संबंधितांनी संगनमताने बँकेच्या पैशाचा अपहार केला आहे. आरोपींनी स्वतःची अस्तित्वात नसलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून आपले नोकर- चाकर, मित्रमंडळी, संबंधित यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून बँकेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या विशेष लेखापरीक्षकांनी २९ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ठोस तपास करुन सहा नव्याने आरोपी निष्पन्न केले, तर आठ आरोपींना अटक केली होती. यापैकी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर, त्यांचे बंधू रमेश खामकर, अर्जुन खामकर, बँकेचे व्यवस्थापक रमेश जाधव याशिवाय बँकेला सर्च व मूल्यांकन करून देणारे वकील व इंजिनियर यांनाही अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सहा आरोपी मयत आहेत. ज्या आरोपींकडून तपास पूर्ण झाला अशा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अजूनही काही लोकांना ताब्यात घ्यायचे असून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा शोधण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने वीस हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन शिंदे करत आहेत. त्यांना विक्रम कणसे, अजित पवार, संजय मोरे, शफिक शेख, संकेत माने आदींना मदत केली. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने ठेवीदारांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. आरोपींची मालमत्ता जप्तीची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केली आहे.
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |

राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |
रस्ता अडविल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा |