फलटण : देशात किंवा राज्यात कधीही नैसर्गिक संकट आले तर मदतीसाठी फलटणकर अग्रभागी असतात, हा इतिहास असून चिपळूण येथील पुरग्रस्तांसाठी फलटणकरांनी केलेली मदत अनमोल असल्याचे गौरवोद्गार प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी काढले.
आम्ही फलटणकरतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली असून सदर मदतीसाठी फलटणकरांनी मोठा हातभार लावला आहे. ही भरीव मदत चिपळूणकडे रवाना करताना प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, नसीर शिकलगार, सदाशिवराव जगदाळे, राजाभाऊ नागटिळे, प्रसन्न रुद्रभटे, शंकरराव मुळीक, राहुल शहा, धनराज कदम, तात्या गायकवाड, अभिजित भोसले (हॉटेल ब्रम्हा), इम्तियाज तांबोळी, उद्धव बोराटे, अल्ताप पठाण, नितीन जगताप, श्रीकांत पालकर हे उपस्थित होते.
फलटण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चिपळूण येथील पुरग्रस्तांसाठी मदतीची हाक देताच मोठ्या प्रमाणात अल्पावधीतच मदत गोळा झाली. यावरूनच फलटणवासीयांची मदतीची भावना दिसून आली. गोळा झालेली मदत गरजवतांना निश्चितच पोहचेल, असा विश्वास प्रांताधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केला.
कु. देवयानी अमोल सस्ते हिच्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या रकमेचे ब्लॅंकेट चिपळूण येथील पूरग्रस्त भागातील लोकांसाठी यावेळी देण्यात आले. याप्रसंगी तिचा सत्कार नगरसेवक अशोकराव जाधव यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपालिकेतील निवृत्त अधिकारी सदाशिवराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |