01:08pm | Jul 15, 2020 |
नवी दिल्ली: ऑनलाईन वर्गांबाबत पालकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर केंद्र सरकारने ऑनलाईन वर्गासाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. कोरोना संसर्गामुळे देशभरात 16 मार्चपासून शाळा बंद आहेत. यामुळे सुमारे 24 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. या काळात किमान एक सत्र ऑनलाइन सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने ऑनलाइन वर्गांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. प्रज्ञाता’ नावाने जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वर्गाचा वेळ आणि एकूण सत्रांची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, पूर्वप्राथमिकच्या (प्री-प्रायमरी) विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ ऑनलाइन वर्ग असणार नाही. पहिली ते आठवीसाठी 45-45 मिनिटांचे दोन, तर 9वी ते 12वीसाठी 30 ते 45 मिनिटांचे चार सत्र व्हावेत, अशी शिफारस केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हे निर्देश घरी बसून असलेल्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करून दिले आहेत. घरी बसून शिक्षण घेण्याचे तंत्र व त्यातील गुणवत्ता टिकवणे याकडे शाळांना लक्ष द्यावे लागेल, असे निशंक यांनी म्हटले आहे.
गावी परतलेल्यांचे शाळांत दाखले
जे लोक कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गावी परतले आहेत अशांच्या मुलांना गावातच शाळांमध्ये प्रवेश द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यासाठी मुलांचा जो डेटा तयार केला जाईल त्यात प्रवासी किंवा अस्थायी अशा नोंदी कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |