02:53pm | Nov 02, 2022 |
मुंबई : तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका नेत्यासोबत दुर्दैवी प्रसंग घडला. राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. नितीन राऊत हे यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागत होते. पोलीस लोकांना राहुल गांधी यांच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते. यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. या सगळ्या गदारोळात नितीन राऊत यांच्या डोळ्याला जबर मार बसला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना ढकलले तेव्हा ते जमिनीवर आपटले. यावेळी त्यांचं डोकं जमिनीवर आपटणार होतं. त्यापासून वाचण्यासाठी नितीन राऊत यांनी डोक्याभोवती हात ठेवला होता. मात्र, या नादात त्यांचा चेहऱ्याला मार लागला. त्यांच्या उजव्या डोळ्याला जबर मार लागला असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला आहे. त्यामुळे त्यांचा डोळा अक्षरश: काळानिळा पडला होता. त्यांच्या हातापायालाही खरचटले आहे. यानंतर नितीन राऊत यांना उपचारासाठी हैदराबादच्या बासेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, के.सी. वेणुगोपाल, के. राजू यांच्यासह प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तर राहुल गांधी यांनी नितीन राऊत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी राहुल यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मंगळवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला. डॉक्टरांनी नितीन राऊत यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा डोळा आणि कानाच्या मधील भागात फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. नितीन राऊत यांनी प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडले जाईल.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |