10:50pm | Sep 16, 2020 |
कराड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावाच्या हद्दीत एस. के. पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्या टोळीला बुधवारी दुपारी कराड शहर पोलिसांनी विद्यानगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व पंपावरून लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
विकी उर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (वय 27, रा. होली फॅमिली स्कूलच्या पाठीमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर-कराड, मूळ रा. नरवणे, ता. माण), अनुभव सुरेंद्र मिश्रा (वय 19, मूळ रा. दिलेरगंज, ता. कुंडा, जि. प्रतापगड, राज्य उत्तरप्रदेश), सुमितसिंग मालसिंग सिंग (वय 36, मूळ रा. धनकमई, ता. खाघर, जि. फतेपूर), विरप्रतापसिंग महादेव सिंग (वय 25, मूळ रा. तंजपूर, ता. बिंदकी, जि. फतेपूर), शुभम मनोज सिंग (वय 18, मूळ रा. आखरी, ता. खागा, जि. फतेपूर), उमजा सुमितसिंग सिंग (वय 26, मूळ रा. धनकमई, ता. खाघर, जि. फतेपूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रजनजीक शिवडे येथे एस. के. पेट्रोल पंपावर कट्ट्याचा धाक दाखवत सहा दरोडेखोरांनी पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने पंपावर येऊन तेथील कर्मचारी व मँनेजनला मारहाण करीत पंपावरील रोख रक्कम व दोन मोबाईल लंपास केले होते. यामध्ये सहा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. या घटनेमुळे मंगळवारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी भेट देऊन या गुन्ह्याचा छडा लवकर लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशाप्रमाणे पोलिसांच्या वेगवेगळ्या टीत तैनात करण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजवरून कराड शहर पोलिसांना कराडमधील एकजण या कटात सामील असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. सर्व दरोडेखोर विद्यानगर येथे राहत असलेल्या विकी बनसोडे याच्या घरात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विद्यानगर येथील विकी बनसोडेच्या घराच्या आजूबाजूला पोलिस बंदोबस्त तैनात करून सिनेस्टाईल पद्धतीने त्याच्या घरावर छापा टाकून सहा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी कट्टा व लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस हवालदार आनंदा जाधव, मारूती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, संग्राम पाटील, अनिल चव्हाण, रविंद्र देशमुख, सागर भोसले यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |