03:25pm | Jul 18, 2020 |
नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल भारतात होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन यंदा दुबईत होणार हे जवळपास निश्चीत झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.
भारत सरकारकडून अधिकृत परवानगी आणि ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 विश्वचषकाबद्दल आयसीसीने अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलबद्दल आपली घोषणा करणार असल्याचं कळतंय. शुक्रवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक झाली, त्यात या निर्णयावर एकमत झाल्याचं कळतंय. आयसीसीने टी-20 विश्वचषक रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर, बीसीसीआय भारत सरकारकडे आयपीएल भारतात आयोजन करण्याबाबत परवानगी मागेल. पण देशातली परिस्थिती तोपर्यंत सुधारलेली नसेल तर यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये हलवली जाईल. जाणून घेऊयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले.
जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान अशी ओळख मिळवलेल्या मोटेरा स्टेडीयमवर यंदा करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एकही सामना भरवता आला नाही. पण वर्षाअखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाण्याआधी मोटेरा मैदानावर भारतीय खेळाडूंसाठी कँपचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. मोटेरा मैदानात खेळाडूंना राहण्याची व्यवस्था आहे. सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या मैदानात गरज पडल्यास खेळाडूंना क्वारंटाइन करण्याची सुविधाही आहे.
याव्यतिरीक्त राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने सीईओ पदासाठी जाहीरात देण्याचं ठरवलं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला 4 हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत होती. त्यामुळे आयसीसी आता टी-20 विश्वचषकाबद्दल अधिकृत निर्णय कधी घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |