01:19pm | Jun 05, 2020 |
तिरुवनंतपुरम : केरळच्या पलक्कउ येथे गर्भवती हत्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सर्वच स्तरातून कठोर निंदा झाली. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. केरळचे वनमंत्री के. राजू यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आले आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. लवकरच यासंदर्भात आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. या घटनेतील आरोपींचा सुगावा देणार्याला केरळच्या दोन संघटनांनी दीड लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. यानंतरच अटक आणि ताब्यात घेण्याचे सत्र सुरू झाले.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारीच एक ट्विट केले होते. त्यानुसार, “केंद्र सरकारने केरळमध्ये हत्तीच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यातील गुन्हेगाराला योग्य पद्धतीने पकडण्यात आम्ही कुठलीही गय करणार नाही. फटाके खाऊ घालणे आणि ठार मारणे ही भारतीय संस्कृती नाही.” केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात राज्याकडून अहवाल देखील मागवला. सोबतच, यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हत्तीच्या दोषींना पकडण्यात मदत करणे किंवा त्यांचा पत्ता देणार्यांसाठी खासगी संघटनांनी लाखो रुपयांच्या बक्षीसांची घोषणा केली आहे. वाइल्ड लाइफ एसओएस एनजीओने दोषींचा पत्ता सांगणार्याला 1 लाख रुपये देऊ अशी घोषणा केली. ही माहिती लोकांना 9971699727 या मोबाईल क्रमांक किंवा info@wildlifesos.org या ईमेल आयडीवर देता येईल. तसेच ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेने आरोपींची माहिती देणार्यास 50 हजार रुपये देऊ असे जाहीर केले आहे. यास संस्थेला 7674922044 या क्रमांकावर व्हॉट्सअप करून माहिती पाठवता येईल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |