08:23pm | Jan 15, 2021 |
सातारा : पंचवीस हजार रुपये उसने घेतल्याच्या बदल्यात त्याची सव्याज सव्वा लाखाची वसुली करणारा गडकर आळी शाहूपुरी येथील मयूर गोसावी व मध्यस्थ गणेश पुजारी हे खाजगी सावकारी करत आहेत. पोलीस अधीक्षकांनी आदेश देऊनही शाहूपुरी पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गणेश पाटील (रा. सदगुरूनगर, अंबेदरे रोड, शाहुपुरी) याने पत्रकार परिषदेत केला.
पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आईच्या ऑपरेशनसाठी पुजारी याच्या माध्यमातून गोसावीकडून ऑनलाईन वीस व रोख पाच हजार असे पंचवीस हजार रुपये स्वीकारले. ती रक्कम दोन टप्प्यात देऊनही गोसावी याने त्या रकमेचे व्याज देण्यासाठी दबाव वाढवत दमदाटी व शिविगाळ केली. हा प्रकार १२ डिसेंबर २०२० रोजी घडला. या त्रासामुळे मी वेळोवेळी गोसावी याला १ लाख १५ हजार रूपये दिले. गोसावी याने आणखी व्याजाची मागणी केली व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
शाहूपुरी पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यासाठी गेलो असता तक्रारीत सावकारी हा शब्द वापरू नका, असा दबाव पोलिसांनीच टाकल्याचा आरोप पाटील यांनी केला. आमच्या सहकारी सायली त्रिंबके यांच्याशी हवालदार किशोर जाधव यांनी उद्धट वर्तन केले. याची तक्रार आम्ही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली. अधीक्षकांच्या आदेशानंतरही शाहुपुरी पोलीस खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या प्रकरणात मला योग्य न्याय मिळावा अशी मागणी गणेश पाटील याने पत्रकार परिषदेत केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |