11:07am | Jul 01, 2021 |
फलटण : फलटण नगर परिषदेत गेली दोन वर्षे विकासाची कामे करणारे कॉन्ट्रॅक्टर यांना कमिशनसाठी नाहक त्रास दिला जात असून कोणीही काम करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. छोट्या-मोठ्या ठेकेदारांना कमिशन साठी वेठीस धरले जात आहे. मिस्टर रामराजे यांनी यात लक्ष घालावे. आपल्याच आशीर्वादाने नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून आलेल्या पांडुरंग गुंजवटे याने कमिशनसाठी नगरपालिकेत उच्छाद मांडला आहे. ठेकेदारांना 15 टक्के कमिशन ची मागणी केली जात आहे. जे अडचणीत आहेत, त्यांनी हे कमिशन दिले सुद्धा आहे. परंतु अशा प्रवृत्तीना आळा बसला पाहिजे. नगरपालिकेत कोणतेही टेंडर अथवा बिले दाखवल्याशिवाय पास करायची नाहीत, असा प्रशासकीय अधिकार्यांना सज्जड दम पांडुरंग गुंजवटे यांनी दिला आहे. त्यामुळे पालिका अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करीत आहेत, अशी माहिती फलटण पालिकेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी दिली.
पुढे बोलताना अशोकराव जाधव म्हणाले, याबाबत अधिकारी-कर्मचारी यांनी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आहे. मुख्याधिकारी यांनी वेळीच अशा नगरसेवकाला आळा घालावा. नाहीतर ठेकेदार व कर्मचार्यांसाठी आंदोलन करावे लागेल. मिस्टर रामराजे आणि मिस्टर संजीवराजे यांनीही यात लक्ष घालून नगरपालिकेची होणारी बदनामी थांबवावी व पांडुरंग गुंजवटे यास योग्य ती समज द्यावी. नाहीतर नाकापेक्षा मोती जड या म्हणी प्रमाणे नगरपालिकेचा कारभार चालू आहे, अशी जनतेत कुजबुज तर चालूच आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |