12:35pm | May 10, 2022 |
मुंबई : एकीकडे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून मृत्यू घटले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे नवे 2 हजार 288 रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत ही मोठी घट आहे. 919 रुग्णांची घट झाली आहे. आदल्या दिवशी 3207 कोरोनाबाधितांची नोंद आणि 29 जणांचा मृत्यू झाला होता.
कोरोना बाधितांची आणि मृत्यूंची संख्या घटली
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. देशात एकुण 4 कोटी 25 लाख 63 हजार 949 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 31 लाख 7 हजार 689 झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 637 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबळींसह कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकुण संख्या 5 लाख 24 हजार 103 वर पोहोचली आहे.
ठाण्यात 16 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील ठाण्यात 16 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांसह महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 9 हजार 224 वर पोहोचली आहे.
12-14 वयोगटातील 3 कोटींहून अधिक मुलांना पहिला डोस
देशव्यापी कोरोना लसीकरणात 12-14 वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |