फलटण : दारुच्या नशेत तर्रर झालेल्या दोन मुलांनी आपल्याच जन्मदात्या वडिलांचा खून केल्यामुळे फलटण शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून या विचित्र घटनेमुळे फलटण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत माहिती अशी की, फलटण शहरातील उपनगर असलेल्या मलटण येथील सगुणामाता नगर येथे राहणार्या बाळू गणपत देशपांडे (वय 50) यांना त्यांच्याच दोन मुले तेजस उर्फ सोन्या भाऊ देशपांडे व शिवतेज बाळू देशपांडे यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे दोन ते तीनच्या सुमारास गंभीर मारहाण केली. आवाज आल्यानंतर बाजूलाच झोपलेल्या त्या मुलांच्या आईने काय प्रकार आहे, हे पाहिले असता दोन्ही मुले टीव्ही लावून दंगा करीत होती, तर बाळू देशपांडे हे बाजूलाच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले होते, तर त्यांचा एक कान पूर्णपणे छिन्नविछिन्न करण्यात आला होता. यानंतर जखमी बाळू देशपांडे यांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयीन सूत्रांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. यानंतर मृताची पत्नी नंदा बाळू देशपांडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या दोन्ही मुलांनी दारुच्या नशेत माझे पती बाळू गणपत देशपांडे यांना वीट व इतर हत्याराने मारहाण केली आहे. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला आहे.
नंदा देशपांडे यांच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी फलटण शहरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |