07:00pm | May 27, 2023 |
सातारा : म्हसवड, वडूज, दहिवडी, सातारा, धायरी, कामोठे रायगड येथे वेगवेगळ्या ठिकाणी विविध बँकांच्या एटीएम कार्ड च्या माध्यमातून एटीएम मशीन मध्ये तांत्रिक अडथळा निर्माण करून तीन कोटी 37 लाख 72 हजार 500 रुपये काढून बँकांची फसवणूक करणाऱ्या कानपूर उत्तर प्रदेश येथील चौघांना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर येथील हे आरोपी महाराष्ट्रात येऊन त्यांनी कामोठे जिल्हा रायगड, धायरी जिल्हा पुणे तसेच सातारा जिल्ह्यातील म्हसवड, वडूज, दहिवडी आणि सातारा येथील वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मध्ये जाऊन एटीएम च्या स्कॅनर मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करत असत आणि बनावट एटीएम द्वारे बँकांची सुमारे तीन कोटी 37 लाख 72 हजार पाचशे रुपयांची फसवणूक या टोळीने केली होती.
याबाबतची सखोल माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून म्हसवड पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे कानपूर पर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न केले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने कानपूर येथील चौघा आरोपींना अत्यंत कौशल्याने सापळा रचून अटक केली. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस हवालदार अमित झेंडे, अजय जाधव, रवींद्र बनसोडे, नितीन धुमाळ यांनी या भाग घेतला होता,
आरोपींकडून चार मोबाईल, विविध बँकांचे एटीएम ताब्यात घेण्यात आले आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी वापरलेल्या एटीएम कार्डाच्या आधारे सुमारे 879 खात्यांची माहिती घेऊन ती रक्कम गोठविण्यात आली आहे. या माध्यमातून सुमारे 86 लाख 45 हजार 600 रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. म्हसवड पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |