रांची : झारखंडच्या पाकूरमध्ये LPG सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 20-25 जण जखमी झाले आहेत. पाकूरच्या लिट्टीपाडा-आमदापारा मुख्य रस्त्यावर पडेरकोलाजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधून 40 हून अधिक लोक प्रवास करत होते. बसचा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बसचा पत्रा कापावा लागला. अपघातात जखमी झालेल्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या ट्रक भरधाव वेगाने येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. या अपघातामुळेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासन आणि पोलिसांचे पथक येण्यापूर्वीच मदत आणि बचावकार्य सुरू झाले होते. त्यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम वेगात करण्यात आले. अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |