पुसेगाव: बहुजन समाजाची प्रगती शिक्षणाशिवाय होणार नाही. हे ओळखूनच कर्मवीर अण्णांनी आपल्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ.अशोक भोईटे यांनी व्यक्त केले.
पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयात 133 वी कर्मवीर जयंती समारंभ ऑनलाईन संपन्न झाला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले, कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला रयतहे नाव देऊन बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण केला.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे म्हणाले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक विकास झाला. खेड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. तसेच कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव नजीकच्या काळात नॅक मूल्यांकनाला सामोरे जात आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बंडोपंत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.निरंजन फरांदे तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.श्रीमती मनुजा सोनार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |