12:43pm | Mar 03, 2021 |
बुध: दरुज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा किसन खामकर आणि उपसरपंचपदी रोहित चंद्रकांत लावंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केला.
दरुज ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी लता नवनाथ लावंड, विजया जयकुमार लावंड, सावता बाळू माळी, रमेश खंडू पाटोळे, विठ्ठल विलास आवळे, सारिका तुकाराम आवळे व आशा ज्ञानेश्वर मदने निवडून आले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून मकरंद जाधव यांनी काम पहिले. यावेळी ग्रामसेवक संतोष नाझरकर उपस्थित होते.
दरुजमधील ग्रामस्थांनी गावात सलोख्याचे वातावरण रहावे हा आदर्श विचार रुजवत सर्वपक्षीय महाविकास आघाडी स्थापन करून ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. 3 हजार लोकसंख्या असलेल्या दरुज ग्रामपंचायतीची 9 सदस्य संख्या आहे. 5 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित चार जगांसाठी निवडणूक लढत होऊन गावाने एका विचाराने सर्व पक्षाच्या प्रमुखांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणार्या दरुजमधील सर्वच वरिष्ठ आणि युवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तेढ निर्माण होवू नये म्हणून सर्वपक्षीय आघाडीचा निर्णय अमलात आणला. या निर्णयामुळे गावातील एकोपा वाढून शांतता अबाधित रहाणार आहे.
नूतन पदाधिकार्यांचे खा.उदयनराजे भोसले, खा.श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ.महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि गावातील मान्यवर, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |