12:16pm | Jul 10, 2020 |
पुसेगाव: कृषि उत्पादनक्षेत्रामध्ये पर्यावरणातील बदल, मजूरांचा तुटवडा, खतांच्या वाढत्या किंमती, कमी-अधिक पाऊसमान या विविध समस्यांमुळे उत्पादनावर होणार्या परिणामावर मात करणेसाठी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करुन अधिकाधिक उत्पादन घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषि पर्यवेक्षक मुकूंद म्हेत्रे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांचे क्षेत्रावर आयोजित केलेल्या कृषि संजीवनी सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व पंचायत समिती खटाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, तालुका कृषि अधिकारी अरुण जाधव, माजी उपसरपंच बबन घाडगे, दिनकर पाटील, कृषि विभागाचे रुपाली पंडीत, आप्पासाहेब गौड व श्रीकांत गोसावी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुकुंद म्हेत्रे म्हणाले की, जमिनीची खालावत चाललेल्या प्रतीमुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येवू लागले आहे. यासाठी गांडूळ व कंपोष्टखताची निर्मिती करुन त्यांचा संतुलित वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. मातीतील कर्ब व नत्र यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असून त्यासाठी हयुमसचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. त्यावेळी सोयाबीन पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाबद्दल म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी अरुण जाधव यांनी कृषि विभागाच्या विविध योजनाबाबत मार्गदर्शन केले तर पंचायत समितीचे आप्पासाहेब गौड यांनी आले पिकाबद्दल माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक रुपाली पंडीत यांनी परिश्रम घेतले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |