फलटण : फलटण शहरात माणुसकीच्या भावनेतून काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सुरू केलेला 'माणुसकीची भिंत' हा उपक्रम माणुसकी जपणारा आणि गोर गरिबांना आधार देणारा उपक्रम असून जनतेने या उपक्रमास भरभरून सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले.
फलटण शहरातील महात्मा फुले चौकामध्ये "माणुसकीची भिंत" नको असेल ते द्या, पाहिजे ते घेऊन जावा हा उपक्रम काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सुरू केला असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी प्रसाद काटकर बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद फलटण उपविभागचे कार्यकारी अभियंता सुनील गरुड, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, माऊली सावंत आदी उपस्थित होते.
फलटण तालुक्यात सामाजिक भान ठेवून चांगले समाजकार्य करणारी मंडळी एकत्र येऊन कोरोनाच्या संकट काळात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. सध्या थंडी सुरू असून गोरगरिबांना माणुसकीची भिंत माध्यमातून उबदार कपडे, अंथरूण-पांघरून मोफत मिळनार आहेत. ज्यांच्याकडे देण्याची दानत आहे, त्यांनी या उपक्रमास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन प्रसाद काटकर यांनी केले.
माणुसकीची भिंत या उपक्रमाची देखभाल करणारे अमित मठपती यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमास पहिल्याच दिवशी प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी सढळ हाताने मदत केली.
माणुसकी भिंत हा सामाजिक उपक्रम महात्मा फुले चौक येथे गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत हा उपक्रम 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ज्यांना कपडे, उबदार पांघरून, जीवनावश्यक वस्तू यांची गरज आहे त्यांनी घेऊन जावे. तसेच दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |