12:45pm | Mar 27, 2024 |
सातारा : शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांच्या जीवावर उठणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी सातारा पालिका आक्रमक झाली आहे. पालिकेच्यावतीने सायन्स कॉलेजसमोर झाडावर ॲसिड प्रयोग करणाऱ्या विरोधात आणि देवी कॉलनीत परवानगी शिवाय झाड तोडणाऱ्या तिघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयासमोर अज्ञाताने झाडावर ॲसिड प्रयोग केल्याची घटना समोर आली. ही बाब हरित सातारा या पर्यावरणीय ग्रुपच्यावतीने पालिकेला सांगण्यात आली. १८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याचा पंचनामा करण्यात आला. कोणत्याही परवानगीशिवाय वृक्ष नष्ट केल्याचा गुन्हा अज्ञातावर दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच सदरबझार येथील देवी कॉलनीत ८ जानेवारी रोजी सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेल्या चाफ्याचे सुमारे सात फुट वाढलेले झाड, त्याच्या शेजारी असणारा बहावा आणि सप्तपर्णीचे झाड कोणत्याही परवानगीशिवाय नष्ट केल्याचा ठपका ठेऊन देवी कॉलनीतील अमर लक्ष्मण जाधव आणि दिग्विजय अमर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पालिका वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी दिली.
पालिकेच्या धडक कारवाइचे पर्यावरण प्रेमींकडून कौतुक
सार्वजनिक जागेवर असलेल्या वृक्षांची होणारी कत्तल साताऱ्यात गंभीर रूप धारण करत आहे. शहरात दोन आठवड्यात तब्बल चार घटना उघडकीस आल्याने पालिकाही अॅक्शन मोडवर आली. जागेचा पंचनामा करून योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रस्ताव मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यावर तातडीने कारवाइ करण्याचे आदेश त्यांनी दिले. वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने घेतलेल्या भूमिकेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
पर्यावरणीय दृष्ट्या वृक्ष लागवड आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वृक्षांची अडचण वाटून त्यांना संपविण्याची वृत्ती साताऱ्यात वाढत आहे. यावर आळा बसविण्यासाठी हरित सातारा जागल्याची भूमिका बजावत आहे. त्याला प्रशासनाचे बळ मिळाल्याने झाडांची कत्तल होणे निश्चितच थांबेल असा विश्वास आहे. - कन्हैय्यालाल राजपुरोहित, हरित सातारा.
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |

सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |