सातारा : मंजूर केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी तब्बल 50 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी जितेंद्र राजाराम खलीपे वय 51 जिल्हा परिषद बांधकाम विभाग वडूज राहणार पेडगाव रोड वडूज तालुका खटाव मूळ राहणार विटा तालुका खानापूर जि सांगली याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी कार्यालय परिसरात करण्यात आली. या प्रकारामुळे महसूल विभागात खाबूगिरीचा चाललेला गोरखधंदा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांचा अर्थ मूव्हर्स व डेव्हलपिंगचा व्यवसाय असून त्यांच्या आदर्श फर्मच्या वतीने पंचायत समिती महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत तीन रस्त्यांचे व समूह गांडूळ निर्मिती शेडचे कामे करण्यात आली होती. या कामाचे बिल 34 लाख रुपये झाले होते. या बिलाच्या दोन टक्के याप्रमाणे 68 हजार रुपयांची मागणी खलीपे याने तक्रारदारांकडे केली. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष राजेश वाघमारे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महसूल विभाग वडूज येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. खलीपे यांनी 68 हजाराची मागणी केली होती. चर्चेअंती पन्नास हजार रुपये घेताना खलीपे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून वडूज पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस निरीक्षक सचिन राऊत, विक्रम पवार, गणेश ताटे, निलेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत, नितीन गोगावले, प्रियंका जाधव, विक्रम कणसे, मारुती अडागळे या पथकाने ही कारवाई केली.
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |

एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |