02:48pm | Mar 15, 2024 |
मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा उद्या होण्याची शक्यता असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा होत आहे. दुसरीकडे नाराज नेते संधी शोधत दुसऱ्या पक्षात उड्या मारताना दिसून येतात. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्याहस्ते त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करुन शरद पवारांची विचारधारा हीच माझी विचारधारा असल्याचे म्हटले. तर, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही शरद पवारांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांचे संकेत दिले. त्यानंतर, वसंत मोरेंनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे.
वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, मनसेला राम राम केल्यानंतर मोरे यांना काँग्रेस, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांकडून ऑफर असून स्वत: संजय राऊत यांनीही फोन करुन वसंत मोरेंशी चर्चा केली होती. तर, वसंत मोरे हे वॉशिंग मशिनसोबत जाणार नाहीत, असेही राऊतांनी म्हटले होते. आता, मोरे यांनी शरद पवारांनंतर आज संजय राऊतांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट केले. वॉशिंग मशीन नको, असे मोरे यांनी म्हटले आहे.
वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी यापूर्वीही पत्रकार परिषेद आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकरांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे, आपण धंगेकर यांच्याशी फोनवर बोललो असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही मोरे यांनी म्हटले.
''महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची मी भेट घेतली आहे. मी ज्या नेत्यांची भेट घेतली ती सर्वांसमोर घेतली असून कुठलीही पडद्याआड चर्चा नाही. तसेच, मी सर्वांना माझी भूमिका सांगितली असून मला पुणेकरांसाठी ही निवडणूक लढायची आहे,'' असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच, महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत माझी सकारात्मक चर्चा होत असून पुण्यात वॉशिंग मशीन नको, असे म्हणत वसंत मोरे यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तर, काँग्रेस आमादर रविंद्र धंगेकरांसोबत माझं फोनवर बोलणं झालं आहे, लवकरच त्यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |