‘ए गणपत, चल दारु ला’, असं गाणं असलेला चित्रपट दहा-बारा वर्षापूर्वी प्रदर्शित झाला. खरेतर दारु कोणीही आणलेली चालली असती. ती गणपतनेच आणावी का? असा काही नियम होता काय? असा प्रश्न पहिल्यांदा ते गाणं ऐकताना पडलेला होता. वास्तविक, हिंदी चित्रपटांमध्ये मराठी नावांची हेटाळणी केली जाते. कधी रामूकाका, तर कधी गणपत. असो... दारु कोणी आणि कोणासाठी आणावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या गाण्यामधील गणपत असो किंवा बाळ सिताराम अर्थात बा. सि. मर्ढेकर यांच्या कवितेतील गणपत वाणी, आपली संपूर्ण हयात चित्रसृष्टीत घालवणारे परंतू सरतेशेवटी पदरात उपेक्षाच पाडून घेणारे दिवंगत अभिनेते गणपत पाटील असोत; यांच्या पदरी यश कधी असे आलेच नाही. बाळ सिताराम अर्थात बा. सि. मर्ढेकर यांची कुलभूमी सातारा शहरानजिक असलेले मर्ढे गाव. जन्म खान्देशातील फैजपुरचा. अल्पायुष्यात जेमतेम 126 कवितांचे लिखाण त्यांनी केले. त्यातील ‘पिंपात मेले ओले उंदीर आणि गणपत वाणी’ या चर्चेतल्या आणि लक्षात राहण्यासारख्या. त्यातली ‘गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी’ परंतू शेवटी बिडी ऐवजी काडी चावून गणपत वाणी मरुन गेला. मात्र त्याला शेवटपर्यंत माडी बांधता आली नाही. क्षुद्रतेचे अतिशय भेदक वर्णन या कवितेतून बा.सि.नी केले. गणपत वाण्याप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने हादरवून सोडणार्या व आयुष्याच्या शेवटपर्यंत नाच्या ची भूमिका वठवणार्या गणपत पाटलांनाही आपल्या स्वप्नांची माडी कधी बांधताच आली नाही. पाटील असूनही चित्रपटांमध्ये नाच्या ची भूमिका करतो, असे टोमणे आणि अवहेलनांनी त्यांची आयुष्याच्या शेवटापर्यंत पाठ सोडली नाही. गणपत पाटील चित्रपटांमध्ये नाच्या ची भूमिका वठवत असल्याने त्या काळामध्ये लोकांनी गणपत हेच नाव ‘ब्लॅक लिस्टेड’ केले होते. त्याकाळी कोणीही आपल्या मुलाचे नाव गणपत ठेवायला धजावत नव्हते. त्याला काही अपवाद असूही शकतात. शेक्सपिअरने म्हटलेच आहे की, नावात काय असतं? हल्ली नावावरुन आणि आडनावावरून जात-पात, गावकी-भावकी शोधणारेही पुष्कळ आहेत. त्यामुळे निश्चितच नावात काय आहे, असे विचारणे मूर्खपणाचे ठरु शकते. गेल्या आठवड्यात एका खास जवळच्या मित्राच्या लग्नासाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध गिरीस्थान असलेल्या तमिळनाडूतील कोडाईकनालच्या पुढ्यात वसलेल्या पलानी या शहरात जाणे झाले होते. बहुसंख्य तमिळ लोकांची श्रद्धा असलेल्या मुरुगन स्वामी मंदिराच्या समोरच एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबलो होतो. तारांकित असलेले हॉटेल आणि समोरच समुद्र सपाटीपासून 7 हजार 200 फुटावर असणारे पश्चिम घाटातील कोडाईकनाल हे गिरीस्थान लक्ष वेधून घेत होते. मात्र असे असतानाही ज्या हॉटेलात थांबलो होतो, त्या हॉटेलची एक गोष्ट सुखावत होती, ती म्हणजे त्या हॉटेलचे नाव, ‘गणपत ग्रँड’. खरंतर महाराष्ट्रात विविध माध्यमातून उपेक्षित ठरविण्यात आलेले हे नाव. परंतू या नावापुढे ‘ग्रँड’ जोडून खर्या अर्थाने या नावाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम ज्याने हे हॉटेल बांधले त्याने केलेले आहे, असे मला वाटते. बा.सि.च्या कवितेतील गणपत वाणी बिडी म्हणून नुसतीच काडी चावतो, तो काय माडी बांधणार? किंवा चित्रपटांमध्ये नाच्या ची भूमिका करुन तो काय सुपरस्टार होणार? परंतू गणपत वाण्याने काडी चावूनही दुकानातून विकल्या गेलेल्या जिन्नसांचे पैसे मोजून-मोजून, आणि तेही कित्येकदा आनंद मिळवला. शेवटी माडी बांधणे हा ज्याचा-त्याचा विषय असतो. किंवा गणपत पाटलांनी चित्रपटात नाच्याची भूमिका करुनही त्यांनी मुले जन्मास घातली. त्यामुळे कोण, काय म्हणतो त्याला अर्थ उरत नाही. चांगले दोन-चार दिवस गणपत ग्रँड मधला मुक्काम झोडल्यानंतर गणपत वाणी असो वा गणपत पाटील, किंवा ‘ए गणपत चल दारु ला, इसमें सोडा थोडा कम, थोडा पाणी मिला। थोडा टेबल-बिबल साफ कर दे ना यार’, असे म्हणत दारुवर झिंगणार्यांना गणपत ची किंमत कळणार तरी कशी? याबद्दलची खात्री झाली. असो... यानिमित्ताने आपल्याकडे गणपत ची कदर का होत नाही, हे कळायला मात्र वेळ लागला नाही. पलानी मधील ज्याने कोणी गणपत च्या पुढे ‘ग्रँड’ जोडून या नावाला खर्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे. ग्रँड म्हणजे काय? तर मोठा, विशाल. गणपत च्या पुढे ग्रँड जोडून क्षुद्रतेची जळमटे झटकण्याचा संबंधिताने जो प्रयत्न केला आहे, तो खरेच अतर्मनाला भिडणारा आहे. त्यामुळे गणपत ग्रँड होता, गणपत ग्रँड आहे, गणपत ग्रँड च राहील... आमीन !
-संग्राम निकाळजे.
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |