03:37pm | Nov 23, 2023 |
अगदी विकतच्यापेक्षाही खूप उत्कृष्ट चवीचं गुलकंद तुमच्या घरीच तयार झालेलं असेल....
गुलाबाच्या पाकळ्यांचा संपूर्ण अर्क ज्यामध्ये उतरलेला असतो, ते गुलकंद अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. दररोज नियमितपणे अगदी थोडंसं जरी गुलकंद खाल्लं तरी आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होतात. शरीरातली उष्णता किंवा दाह कमी होतो, तसेच त्वचेचे सौंदर्य वाढण्यासही मदत होते. म्हणूनच विकतचे महागडे आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे प्रिझर्व्हेटिव्ह टाकून तयार केलेले गुलकंद खाण्यापेक्षा घरच्याघरी अगदी नैसर्गिकपणे गुलकंद कसे तयार करायचे ते पाहूया!
गुलकंद तयार करण्याची रेसिपी :
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुलाबाची फुलं भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे गुलकंद तयार करण्यासाठी सध्याचे दिवस अगदी उत्तम आहेत. गुलकंद तयार करण्यासाठी गावरान गुलाबाचाच वापर करावा. घरच्याघरी गुलकंद कसं तयार करायचं, याविषयीचा हा व्हिडिओ pawar_omkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
साहित्य :
गुलाबाच्या पाकळ्या- ३०० ग्रॅम
साखर- १०० ग्रॅम
पिठी साखर- २०० ग्रॅम
मध- ५० ग्रॅम
बडिशेप पावडर १० ग्रॅम
वेलची पावडर अर्धा टीस्पून
कृती :
सगळ्यात आधी गुलाबाच्या पाकळ्या एका मोठ्या भांड्यात घ्या.
त्यानंतर साखर आणि बडिशेप एकत्र करून त्याची पावडर करून घ्या. ती पावडर गुलाब पाकळ्यांमध्ये टाका. तसेच पिठी साखरही टाका.
आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून कालवून घ्या. हाताचे चोळून चोळून एकजीव करून घ्या. हळूहळू गुलाबाला पाणी सुटेल.
यानंतर त्यात वेलची पावडर तसेच मध टाका आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
आता हे मिश्रण एका एअर टाईट काचेच्या बरणीत भरा आणि ३ दिवसांसाठी उन्हामध्ये ठेवा.
३ दिवसांनी बरणी उघडून पाहा. अगदी विकतच्यापेक्षाही खूप उत्कृष्ट चवीचं गुलकंद तुमच्या घरीच तयार झालेलं असेल...
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |