सातारा : चाफळ विभागातील गमेवाडी व वाघजाईवाडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी ओमनी गाडीतून आलेल्या अज्ञातांनी रस्त्यावर उभे असलेल्या पाळीव कुत्र्यावर छऱ्यांच्या बंदुकीने गोळी झाडल्याने एक कुत्रे जागीच ठार झाले, तर वाघजाई वाडी येथील दोन कुत्री गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाघजाई वाडी येथील ओंकार संजय महिपाल यांच्या मालकीचे पाळीव कुत्रे रात्रीच्या वेळी घराबाहेर होते. त्यावेळी ओमनी गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी घराबाहेर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर गाडीतून छऱ्याच्या बंदुकीने गोळीबार केला, तर एका मोकाट कुत्र्यावरही गोळ्या मारल्या. यामध्ये दोन्ही कुत्री जखमी झाली आहेत, तर याच विकृत अज्ञानाने गमेवाडी येथील संतोष टिकुडे यांच्या कुत्र्याला गोळी घालून ठार मारले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आहे. त्या मृत कुत्र्याचा वैद्यकीय पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल घाडगे यांनी केला आहे. चाफळ विभागात प्रथमच असा प्रकार घडल्याने रात्रीच्या वेळी शिकारी राजरोसपणे फिरत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस व वन विभागाने सामूहिकरीत्या तपास केल्यास गोळ्या झाडणारे हाती येतील व त्यादृष्टीने प्रयत्न करून अज्ञातांचा शोध लावला जावा, अशी मागणी विभागातील जनतेतून केली जात आहे.
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |

सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |