सांगली : राष्ट्रीय महामार्गावरील तानंग फाटा पुलाखाली चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या रणजीत श्रीरंग लोखंडे (वय २५, सध्या रा. अहिल्यानगर, मुळ रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. अथणी) व अशोक विश्वनाथ काशिद (वय २६, सध्या रा. प्रकाशनगर, मूळ रा. मांजरी, ता. चिक्कोडी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.
अधिक माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांना तानंग फाटा येथे पुलाखाली दोघे संशयित विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन आले असून दुचाकी विक्री करणार आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेतली. दोघांना पळून जाण्याची संधी न देता पकडले.
दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी काही दुचाकी चोरल्याची कबुली देत त्यापैकीच ही एक असल्याचे सांगितले. चोरीच्या दुचाकी अहिल्यानगर येथे राहत असलेल्या घराजवळ मोकळ्या जागेत लावल्याचे सांगितले. तेव्हा पथकाने दोघांना घेऊन जाऊन अहिल्यानगर येथून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. त्याची किंमत सुमारे साडे सहा लाख रूपये इतकी आहे. दोघांना तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
सहायक निरीक्षक पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, कर्मचारी सचिन धोत्रे, इम्रान मुल्ला, अरूण पाटील, अमोल ऐदाळे, कुबेर खोत, प्रकाश पाटील, अनंत कुडाळकर, सूरज थोरात, सुनिल जाधव, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दोघा चोरट्यांनी मिरज ग्रामीण, तासगाव, कुपवाड, कवठेमहांकाळ, सांगली शहर, कागवाड, कुडची येथे दुचाकी चोरल्या आहेत. रणजीत लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |