09:25pm | Mar 26, 2024 |
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीला केंद्रीय निवड समितीने अनुकूलता दर्शवली आहे. हाच आदेश प्रमाण मानून उदयनराजे यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
बुधवारी उदयनराजे भोसले दिल्लीवरून थेट सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून यावेळी जिल्ह्याच्या हद्दीवर राजेसमर्थक आणि उदयनराजे प्रेमी यांच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी स्वागत कमानी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असा भव्य कार्यक्रम सोहळा सारोळा ते गांधी मैदान राजवाडा यादरम्यान रंगणार आहे. याबाबतची उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांची बैठक साताऱ्यात पार पाडली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे.
खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व खासदार उदयनराजे भोसले यांच्या बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली आणि केंद्रीय मध्यवर्ती निवड समितीने उदयनराजे यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली. महायुतीच्या वतीने महाराष्ट्रात शिंदे गट, अजितदादा पवार गट आणि भाजप यांच्या अंतिम याद्या आणि एकूणच सर्व जागांची माहिती येत्या 28 मार्च रोजी पत्रकार परिषदेद्वारे अंतिम केली जाणार आहे. यापूर्वीच राजे समर्थकांनी उदयनराजे भोसले यांच्या जिल्ह्यातील रॉयल एन्ट्री साठी स्वागताचा जोरदार घाट घातला आहे.
सुमारे एक हजार कार्यकर्ते सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील शिरवळ -सारोळा हद्दीवर एकत्र येणार असून तेथे खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यांना मोठा पुष्पहार घालण्यात येणार असून कार्यकर्त्यांची यावेळी जोरदार घोषणाबाजी होणार आहे. सारोळा, शिरवळ, केसुर्डी, खंडाळा, वेळे, जोशी विहीर, कवठे, भुईंज, पाचवड फाटा, आनेवाडी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, पोवई नाका, शाहू चौक, देवी चौक, मोती चौक ते गांधी मैदान राजवाडा व तेथून जल मंदिर येथे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसह उदयनराजे यांचे फुले उधळून जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापुरूषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
लोकसभा संयोजक सुनील काटकर यांच्या अध्यक्षतेखाली उदयनराजे समर्थकांची सातारा जलमंदिर येथे बैठक झाली. या बैठकीत राजांच्या स्वागत सोहळ्याच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. आरंभ ही प्रचंड है, अशा टॅगलाईनच्या पोस्टरचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष माधवीताई कदम, अॅड दत्ता बनकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, पंकज चव्हाण, संग्राम बर्गे, सौरभ सुपेकर, संदीप शिंदे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची केवळ औपचारिकताच फक्त बाकी आहे. अद्यापही भाजपने काही जागांवर नावे निश्चित केली नसली तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत येथे 28 मार्च रोजी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व नावे जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीने कौल दिल्याचे कार्यकर्ते ठामपणे सांगून पुढील तयारीला लागले आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष गाठीभेटी, मेळावे तसेच जिल्हा दौरा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येत आहे.
उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश पाहायला मिळत असून सातारकरांमधूनही त्यांच्या उमेदवारी संदर्भात शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |