02:13am | May 26, 2019 |
कराड : जुजारवाडी (ता. कराड) येथील एकास बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गेल्या आठवडय़ात शुक्रवारी घडला होता. कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला. बाळकृष्ण महादेव जुजार असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम संजय पाटील, सुनील संजय पाटील, अमोल अधिकराव पाटील, जयवंत दीपक पाटील, अविनाश भास्कर पाटील, बाजीराव संपत पाटील (सर्व रा. जुजारवाडी) यांना गुन्हय़ात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बाळकृष्ण महादेव जुजार हे माजी सरपंच आहेत. गावात पाणी मिळत नसल्याने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. काम सुरू असल्याचे यावरून गेल्या आठवडय़ात शुक्रवारी चर्चा सुरू असताना संशयितांपैकी एकाने माजी सरपंच जुजार यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. जबर मारहाण झाल्याने जुजार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
शनिवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना सांगितले. जुजार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. कालेसह जुजारवाडीतील ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |