कराड : दरवाजा तोडून आत प्रवेश करत चोरटय़ांनी दागिने पळवल्याचा प्रकार रेठरे बुद्रुक ता. कराड येथे घडला. चोरटय़ांनी महिलेच्या गळय़ातील सोन्याचे मणीमंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. चोरटय़ांशी झालेल्या झटापटीत दोघे किरकोळ जखमी झाले असून नितीन गणपतराव गुजर (वय 55 रा. डगरा पाणंद रेठरेबुद्रुक ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गुजर हे पत्नी प्रतिभा मुलगा विवेक व मुलगी अश्विनी यांच्यासह डगरा पाणंद येथे राहतात. 17 डिसेंबर 2018 रोजी रात्री 11.30 वाजता ते सर्वजण झोपी गेले. मध्यरात्री 12.15 वाजता घराच्या मुख्य दरवाजावर मोठय़ाने आवाज झाला. आवाजाने झोपलेले सर्वजण जागे झाले. खिडकीतून दुसऱया खोलीत पाहिल्यावर तीन संशयित तोंडाला पांढरे रूमाल व मफलर गुंडाळून खोलीत येत होते. खिडकीतूनच नितीन गुजर यांनी कोण आहे अशी विचारणा केली. त्यावर केवळ आलोय आलोय असे म्हणत एका संशयिताने दगड दरवाजावर मारला. ते दरवाजा उघडून आतल्या खोलीत आले. त्यांनी महिलेच्या गळय़ातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत दोघेजण किरकोळ जखमी झाले. दागिने हिसकावून चोरटे पसार झाले. हा प्रकार समजताच कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. संशयितांच्या वर्णनावरून त्यांचा शोध सुरू आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |