04:30pm | Jul 19, 2018 |
सातारा : सध्या पावसाळ्यात संपूर्ण सातारा शहर खड्ड्यात गेलेले आहे. त्यातच पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या धीम्या गतीतील कामामुळे सातारकरांची ‘नाकाबंदी’ झालेली असतानाच शिल्लक असलेल्या सातार्यातील चांगल्या रस्त्यांवरुन धूम बाईकर्सची दहशत वाढलेली आहे. या धूम बाईकर्समुळे अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले असल्यामुळे सातारा वाहतूक शाखेने यावर नामी शक्कल काढलेली आहे.
सातारा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्यातील अनेक लोक शासकीय व इतर कामांसाठी सातारा शहरात येत असतात. मात्र, सातार्यात आल्यानंतर या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सातार्याची भौगोलिक रचना अतिशय किचकट आहे. त्यातच रस्त्यांना भलेमोठे खड्डे पडल्यामुळे सातारकरांची मोठी दैना झालेली आहे. विदर्भातील खेड्यापाड्यातील रस्तेसुद्धा सातारपेक्षा चांगल्या दर्जाचे असल्याची म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यातच गेल्या दीड महिन्यापासून सातार्यात धुवॉंधार पाऊस सुरु आहे. उपग्रहातून सातार्याचे छायाचित्र घेतल्यास दुसरे कोयना धरण सातार्यात भरले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतू अशी परिस्थिती असतानासुद्धा सातार्यातील शिल्लक असलेल्या चांगल्या रस्त्यांवर मात्र धूम बाईकर्सची दहशत वाढलेली आहे.
काही दिवसांपूर्वी सातारा येथील उद्योजक राजन शहा यांना हाकनाक आपला जीव धूम बाईकर्समुळे गमवावा लागला होता. या उमद्या उद्योजकाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण सातारा हळहळला होता. त्यामुळे सातारा वाहतूक शाखेसमोर या धूम बाईकर्सचा बंदोबस्त करण्याची डोकेदुखी वाढलेली होती. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आता सातारा वाहतूक शाखा ऍलर्ट झाली आहे. सातारा शहरात महाविद्यालय, क्लासेस व शाळा परिसरांत वाहतूक नियमांचे पालन न करणारे धूम बाईकर्स, कर्णकर्कश हॉर्न, ट्रिपल सीट, सायलेन्सर काढून विनाकारण ध्वनी प्रदूषण करणारे, गाड्यांना फॅन्सी नंबरप्लेट लावणार्या वाहन चालकांचे सजग नागरिकांनी व महाविद्यालयीन युवक-युवतींनी वाहनांची नंबरप्लेट दिसेल, अशा स्थितीमध्ये फोटो काढावेत. जेणेकरुन संबंधित वाहनचालकाला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, असे आवाहन सातारा वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातार्यात वाढलेल्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी सातारा वाहतूक शाखेची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी वाहतूक शाखेला वाहतुकीच्या संदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार सातारा वाहतूक शाखा ‘ऍलर्ट’ झाली असून धूम बाईकर्स व नियम मोडणार्या वाहन चालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक शाखेने मास्टर प्लॅन तयार केला असून वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांच्या गाडीचे फोटो 9923009857 या व्हॉटसऍप नंबरवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |