09:05pm | Jan 16, 2019 |
कराड : पूर्व इतिहास आजकाल सत्ता आणि पैशाच्या ताब्यात गेल्यामुळे आजच्या पिढीला खरा इतिहास ज्ञात नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीतील इतिहासामध्ये यशवंतराव मोहितेंचा ठळक उल्लेख आहे. भाऊंनी अनेक पुरोगामी विचार मांडले. त्यांनी विधानसभेत प्रतिनिधीत्व करत असताना कृष्णाकाठच्या विकासासाठी अनेक संस्था मंजूर केल्या. व त्यावेळच्या संचालक मंडळाने त्या अंमलात आणल्या. कृष्णाकाठच्या विकासाला यशवंतराव मोहितेंच्या रुपाने खरा राजाश्रय होता. असे मत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी व्यक्त केले.
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथे यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यगौरवनिमित्त यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष मारुती मोहिते व राष्ट्रीय काँग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष शिवाजीराव मोहिते यांच्या सहकाऱयांनी आयोजीत केलेल्या बैठकीत ते बोलत होते. राजाराम मोहिते अध्यक्षस्थानी होते. कालवडेचे जेष्ठ नागरिक मारुती बंडू थोरात, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, आदित्य मोहिते, पैलवान नानासाहेब पाटील, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, नितीन थोरात, यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोहिते म्हणाले, यशवंतराव मोहिते यांचे कार्य समाजातील जिज्ञासू व अभ्यासू व्यक्तींना प्राप्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. यशवंतराव मोहितेंच्या नावाने कृष्णा कारखान्याची नोंदणी मिळाली. शेतकरी व कष्टकरी जनतेच्या मालकीचा कारखाना भाऊंनी निर्माण केला. कारखाना उभा करताना संस्थापक प्रवर्तक मंडळातील नेत्यांनी खूप कष्टही घेतले. भाऊ मंत्रीमंडळात होते त्यावेळेस त्यांनी ज्या-ज्या संस्था मंजूर केल्या. त्या संस्था तत्कालीन संचालक मंडळाने राबवल्या. एखाद्या कार्यास राजाश्रय मिळत गेला, तर केवढे मोठे कार्य उभे राहते. हे कृष्णा परिसरात पहायला मिळते.
ते म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये राजकारण शिरल्यानंतर नायनीट होतो. त्याकरिता यशवंतराव मोहिते यांनी यशवंतराव चव्हाण व वसंतदादांच्या मदतीने कायदाही केला. उद्योग राजकीय बटीक बनल्याने व्यक्तीपूजेला महत्व निर्माण झाले आहे. त्यामुळे सभासदांना मालकाऐवजी गुलामगिरी पत्करावी लागत आहे. आजची पिढी मूठभर नवसरंजामशाहीकडे झुकत चालली आहे. मराठा आरक्षणामुळे सामाजीक विषमता वाढण्याची शक्यता जाणवत आहे. यासाठी यशवंतराव मोहिते यांचे पुरोगामी विचार जोपासण्याची गरज आहे. त्यासाठी पुढील दोन वर्षात संघर्षाला आपल्याला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. मी या संघर्षात चालायचे ठरवले आहे. तुम्हीसुध्दा यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. मारुती मोहिते व शिवाजीराव मोहिते यांनी स्वागत केले. सुरेश मोहिते यांनी आभार मानले. यावेळी कालवडे, कासारशिरंबे, मालखेड व वाठार येथील सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |