07:51pm | May 17, 2019 |
भुईंज : काळंगवाडी ता. वाई याठिकाणी 29 वर्षाच्या मुलाने स्वतःच्या आईवरच बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली असून या किळसवाण्या प्रकाराने संपूर्ण काळंगवाडी गाव सुन्न झाले असून आई-मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या आणि मानवी नात्याला काळिमा फासणाऱ्या संशयित आरोपी मुलाला फाशीची शिक्षा करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे. दरम्यान संशयित आरोपी मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याचे वडील ही गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काळंगवाडी ता.वाई येथे गुरुवार दिनांक 16 रोजी रात्री 8 चे दरम्यान संशयित आरोपी मुलाने स्वतःच्या राहत्या घराची आतून कडी लावून स्वतःच्या आईला धमकावून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. मुलगा बलात्कार करत असताना मोठ्याने किंचाळणाऱ्या पीडित महिलेच्या पतीने म्हणजेच संशयित आरोपीच्या वडिलांनी हा आवाज ऐकून मुलाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता पिसाळलेल्या आरोपीने स्वतःच्या वडिलांना न जुमानता त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात ते जखमी झाल्याने त्यांना सातारा येथील क्रांतीसीह नाना पाटील रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले आहे.
माणुसकीला आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने काळंगवाडी येथील महिला आणि नागरिक भयग्रस्थ झालेले असून आहेत. आई आणि मुलगा या पवित्र नात्याची जाण नसलेल्या अश्या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस स्टेशनला झालेली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रजपूत करीत आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |