नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या १३ हजार ६०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जघोटाळ्यास या बँकेचेच कर्मचारी, अधिकारी कारणीभूत असल्याचे दिसत आहे. या घोटाळ्यानंतर बँकेने केलेल्या अंतर्गत चौकशीत ही बाब उघड झाली असून नीरव मोदी व मेहूल चोक्सी या जोडगोळीला बँकेच्या ५४ कर्मचारी, अधिकारी, लेखापाल आदींनी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जानेवारीत हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या बँकेने याविषयी २९ जानेवारीला पहिली पोलिस तक्रार केली. नीरव मोदी व मेहुल चोक्सी या प्रमुख आरोपींनी त्यापूर्वीच देशाबाहेर पलायन केले होते. यानंतर बँकेने अंतर्गत तपास व चौकशी केली. याचा अहवाल १६२ पानी असून त्यातून हे संगनमत उघड झाले आहे. कारकून, परकीय विनिमय व्यवस्थापक (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजर्स), लेखापाल, अधिकारी, शाख्या व्यवस्थापक आदी ५४ जणांच्या टोळीने मोदी व चोक्सीला मदत केल्याचे यात म्हटले आहे. यातील २१ जणांची हकालपट्टी करण्यात आली असून कोणत्याही दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोकळे सोडले जाणार नाही, असे या बँकेचे सीईओ सुनील मेहता यांनी म्हटले आहे. यातील आठ जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या दैनंदिन व्यवस्थापन व कामकाजात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे याच अहवालात उघड झाले आहे. आर्थिक घोटाळे होऊ नयेत यासाठी आवश्यक प्रणाली बँकेत नाही. तसेच, अधिकाऱ्यांना असणारे अमर्यादित अधिकार, मोठ्या व्यवहारांची शहानिशा न होणे आदी या घोटाळ्याची प्रमुख कारणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
या बँकेच्या वेगवेगळ्या शाखांतील कर्मचारी व अधिकारी यात सामील असले तरी ब्रॅडी हाऊस शाखा या घोटाळ्याचे केंद्र असल्याचे दिसत आहे. या शाखेचे उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांनी स्विफ्ट या इंटरबँक मेसेजिंग नेटवर्कच्या माध्यमातून मोदी व चोक्सीला कर्ज मिळावे यासाठी अनेक वर्ष बनावट बँक गॅरंटी दिल्याचा आरोप आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |