06:24pm | Mar 02, 2020 |
फलटण : फलटण तहसिलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठ्याने आणि मंडल अधिकाऱ्याने कर्तव्यावर असतानाच भरदुपारी उकाड्यामुळे होत असलेल्या असह्य त्रासामुळे फलटणमधील एका परमिट रुममध्ये बसूनच बिअरचा आस्वाद घेतला. परंतू त्या दोघांनी एका बिअरवर न थांबता लागोपाठ अनेक बिअर रिचवल्यामुळे ते दोघे ऑनड्यूटी तर्रर्र झाल्यामुळे येणारे जाणारे ‘काय आण्णासाहेब, आज दिवसाच काय?’ अशा प्रश्नांमुळे ते अण्णासाहेब भलतेच चिडले. अण्णासाहेबांच्या ऑनड्यूटी तर्रर्र ची चर्चा मात्र फलटण शहरात चवीने चर्चिली जात आहे.
याबाबत माहिती अशी कि, फलटण तालुक्यात सध्या वाळू चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तालुक्याला पूर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे सध्या तलाठी, मंडलाधिकार्यांची चलती आहे. त्यामुळे वाळू माफियांकडून हप्ते घेवून ते बक्कळ पैसा कमवित आहेत. त्यामुळे फलटणमधील अनेक परमिटरुम व बिअर बारमध्ये तलाठी व मंडलाधिकारी वाळू माफियांसमवेत खुलेआम ऑनड्यूटी मद्याचा आस्वाद घेत असल्यामुळे सातारा महसूलच्या आब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. परवाच एका सामाजिक कार्यकर्त्याने फलटण तहसिल कार्यालयातील मंडलाधिकारी जोशी व तलाठी पंडित यांना मद्यसेवन करीत असताना रंगेहात पकडत ऑनड्यूटी मद्यप्राशन करीत असल्याचे मोबाईलवर शुटिंग केले. त्यावेळी चक्क या दोघांनीही या सामाजिक कार्यकर्त्याला ट्यूबर्ग बिअरची ऑफर केली, परंतू संबंधित कार्यकर्ता निर्व्यसनी असल्यामुळे त्याने या दोन्ही आण्णासाहेबांची ऑफर धुडकावून लावली व शासनाचा पगार घेवून तुम्ही ऑनड्यूटी मद्य पिऊन तर्रर्र झाल्याबाबत त्रागाही व्यक्त केला. मात्र याबाबत आपण कोठेही वाच्यता करु नका, तुमचा गुळंबा तुम्हाला पोहोचवला जाईल, अशी विनंतीवजा लाच ही देऊ केली. मात्र, त्या सामाजिक कार्यकर्त्याने तुम्हाला आता धडा शिकवणारच, असे म्हणत तेथून काढता पाय घेतला. मात्र, आमचं कोणी वाकडं करु शकत नाही. फलटण तहसिलदारासह प्रांताला आम्ही खिशात ठेवतो, असे म्हणत वाळू माफियांसोबत त्यांची ऑनड्यूटी बैठक संध्याकाळी उशिरापर्यंत सुरुच होती. मात्र, फलटण तहसिलदार कार्यालयातील दोन अण्णासाहेब ऑनड्यूटी तर्रर्र झाल्याची चर्चा फलटणमध्ये मोठ्या चवीने चर्चिली जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |