02:23am | Aug 13, 2018 |
कोरेगाव : शहरातील मध्यवस्तीमध्ये सातारा-पुसेगाव मार्गावर शहरातील मेनरोडवर साखळी पुलानजीक असणारे ‘कल्पराज’ व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील ‘पद्मावती सारीज’ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले आणि दुकानातील सुमारे नऊ लाखाचा कपड्यांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनास्थळावरुन लंपास केला.
या घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव शहरात सातारा-पुसेगाव मार्गावर शहरातील मेनरोडवर भरवस्तीमध्ये असलेल्या ‘कल्पराज’ व्यापारी संकुलात तळमजल्यावर पद्मावती सारीज हे फॅन्सी डिझायनर साडी, सुटींग, शर्टींग, ड्रेस मटेरीयल विक्रीचे दुकान आहे. कोरेगाव शहरातील व्यापारी प्रवीण ओसवाल यांच्या मालकीचे पद्मावती सारीज हे दुकान असून प्रवीण ओसवाल आणि त्यांच्या पत्नी सौ. ओसवाल हे पती-पत्नी अनेक वर्षांपासून हे दुकान चालवतात. रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2018 रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास कटावणीच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांनी पद्मावती सारीज या दुकानाचे शटर अर्ध्यापयर्र्ंत उचकटलेल्या अवस्थेत असताना आतील चोरट्यांनी रात्री सव्वा बारा ते पहाटे सव्वा पाच या दरम्यान तब्बल पाच तास दुकानात बसून दुकानातील उंची साड्या, किंमती पैठण्या, जास्त किंमतीचे शर्ट पीस, पँटपीस, भारीतील ड्रेस मटेरीयल कापडी पिशव्यामध्ये, कापडी मोठ्या पोत्यांमध्ये गोळा केले. साधारण दोन मोठ्या पिशव्या आणि अकरा मोठी पोती भरुन किंमती कपड्याच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दुकानाबाहेर आणला आणि शेजारील कापड दुकानदार श्रीरंग सापते यांच्या मालकीच्या लिलाई कलेक्शन या कापड दुकानाच्या शेजारील मोठ्या मोकळ्या जागेत आणून ठेवला. नंतर तो सर्व मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी एका चार चाकी गाडीमध्ये घातला आणि घटनास्थळापासून पोबारा केला. रविवारी मध्यरात्री पावसाची एकसारखी रिपरिप चालू असल्याने आणि ‘कल्पराज’ व्यापारी संकुला समोरील कोरेगाव नगरपंचायतीची ट्यूब लाईट बंद असल्याने रात्रीच्या अंधारात भरवस्तीतील होणार्या चोरीचा पोलीसांना आणि परिसरातील रहिवाशांना पत्ताच लागला नाही. पावसाळी वातावरणात आणि रात्रीच्या अंधारात तब्बल पाच तास अज्ञात चोरटे दुकानात चोरी करीत होते.
सकाळी रविवारी साधारण दहाच्या सुमारास दरम्यान कोरेगावचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा आपल्या पोलीस फौजफाट्यांसह घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या तपासासाठी साताराहून पोलीसांचे श्वानपथक मागण्यात आले. तपासासाठी आणलेल्या श्वानाने कल्पराज व्यापारी संकुलातील तळमजला, पहिला मजला, आणि श्वानपथकाने ‘कल्पराज’ व्यापारी संकुलाचा तळमजला आणि पहिला मजला व परिसर पिंजून काढला. मग संकुलासमोर येवून भूंकू लागला. कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे यांनीही घटनास्थळी येवून सीसीटिव्ही कॅमेराचे फुटेज पाहून तपासाच्या सूचना केल्या.
‘पद्मावती सारीज’ कलेक्शन मधून सुमारे 9 लाखाच्या कपड्यांच्या मुद्देमालासह रोख 11 हजार रुपये चोरीला गेले. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे शेजारील लिलाई कलेक्शनच्या दुकानाचे संकुला बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या फुटेजमध्ये एक अज्ञात चोर कपड्याचे गठ्ठे पायरीवरुन रस्त्याकडेला साधारण 11 पोती आणि दोन पिशव्या या गच्च भरुन किमती कपडे लंपास केले. रविवारी मध्यरात्री सव्वा बारा ते पहाटे सव्वा पाच या वेळेत अज्ञात चोरटे पद्मावती सारीजच्या दुकानात बसून मेणबत्तीच्या प्रकाशात किंमती कपड्याचे गठ्ठे बांधत होते. पोती किंमती साड्यांनी भरत होते. कल्पराज व्यापारी संकुलामध्ये अंदाजे 12 ते 13 दुकाने असून त्यांना वॉचमन ठेवता आला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |