02:02am | Sep 23, 2019 |
सातारा : सैनिक स्कूलमधून चंदनाची झाडांची चोरी करणार्या तीन चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) जेरबंद करत दोन गुन्हे उघडकीस आणले. संशयितांकडील दहा हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे तुकडे जप्त केले आहेत.
सुनील संजय काळे, महेश बाळू बाबर ( वय 36) व लक्ष्मण उर्फ बापू कुंदन मोरे ( वय 35) सर्व राहणार आकाशवाणी झोपडपट्टी,
याबाबत एलसीबीच्या पथकाने दिलेली माहिती अशी, सातारा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गस्त सुरु असून जुन्या गुन्ह्यांची उकल करण्याचे काम सुरु आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असणार्या सैनिक स्कूलच्या आवारातून दोन महिन्यापूर्वी चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून त्याची चोरी केली होती.
चंदन चोरीबाबत एलसीबीच्या पोलिसांना माहिती मिळाली. या गुन्ह्यात तोडण्यात आलेल्या चंदनाच्या झाडांच्या लाकडाची विक्री करण्याकरता आकाशवाणी झोपडपट्टी सातारा येथे काहीजण असल्याचे समजले. संशयित रामकुंडजवळ असलेल्या भिक्षेकरी गृहाजवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. यातील एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे प्राथमिक चौकशी करुन इतर दोघांना त्यानंतर ताब्यात घेतले.त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दोन महिन्यापूर्वी दोन ठिकाणांवरून चंदनाच्या झाडांची चोरी केली असल्याची कबुली दिली. संशयितांकडे 10 हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांची तुकडे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. त्यांना पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्यात या ताब्यात देण्यात आले.
पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस हवालदार सुधीर बनकर, तानाजी माने, मुबिन मुलानी, संतोष पवार, पोलीस नाईक शरद बेबले, विजय कांबळे, निलेश काटकर, प्रवीण फडतरे संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |