कराड : मयत महिलेच्या जागी दुसरी महिला उभी करून येथील सोमवार पेठेतील मोकळ्या जमिनीचा बनावट दस्त करून फसवणूक केल्याप्रकरणी जागा खरेदी घेणार, स्टँप व्हेंडर आणि साक्षीदारांसह एकूण सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बबुताई हरिबा जाधव (वय 70, रा. मालोशी, ता. पाटण) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी बबुताई यांच्या आई स्व. अनुबाई मारूती पवार 18 फेब्रुवारी 1971 रोजी मयत झाल्या आहेत. त्यांना बहिण, भाऊ नाही. त्यांच्या आईची सोमवार पेठेत मिळकत आहे. आईच्या मृत्यूनंतर त्या मिळकतीस वारस नोंद करण्याचे राहून गेले होते. दि. 21 फेब्रुवारी 2018 रोजी समाईक मिळकत 398/अ ला फिर्यादीने त्यांच्या नावाची वारस नोंद केली. त्यानंतर 397 अ/1 या मिळकतीस वारस नावाची नोंद करण्यास गेल्यानंतर ती मिळकत सौ. सुशिला अनिल जाधव यांच्या नावावर असल्याचे आढळून आले. तसेच यासंदर्भातील कागदपत्रे काढली असता मोकळी जागा असताना त्या ठिकाणचा रहिवास पत्ता टाकून, पेपरमध्ये कसलीही जाहिरात न देता, मयत कै. अनुबाई पवार यांच्या जागी अन्य महिलेस दुय्यम निबंधकांपुढे उभी करून दि. 22 मे 2017 रोजी 30 हजार रूपयांस शिक्षिका सौ. सुशिला अनिल जाधव (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी खरेदी केल्याचे समजले. तसेच ती जागा आणि शेजारी जागा विकासकाला देऊन त्या बदल्यात मोबदला घेतला आहे. याप्रकरणी बबुताई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौ. सुशिला अनिल जाधव (रा. सोमवार पेठ, कराड), शरद मोतीचंद बोंदार्डे (रा. शनिवार पेठ, कराड), विश्वनाथ शांताराम शिंदे (रा. मंगळवार पेठ, कराड), अनिल निवृत्ती जाधव (रा. सोमवार पेठ, कराड), रवींद्र बाबुराव पवार (रा. सोमवार पेठ, कराड), विलासराव जगदाळे आणि अनोळखी महिला, अशा सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |