01:47am | Nov 04, 2018 |
कोरेगाव : अंगापूर हे सातारा तालुक्यातील मोठे गाव असून, देखील स्थानिक नेतृत्वाने विकासकामांपासून सातत्याने या गावाला वंचितच ठेवले. भाजप सरकारने या गावाच्या विकासासाठी सुमारे दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करुन दिला आहे. अंगापूरचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी केले.
अंगापूर, ता. सातारा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन ना. चरेगावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख महेश शिंदे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघप्रमुख मनोज घोरपडे, सरपंच सुरेश (बाबा) कणसे, उपसरपंच सौ. जयश्री कणसे, माजी उपसरपंच नारायणराव कणसे, विकास सोसायटीचे चेअरमन अरविंद कणसे, संतोष गायकवाड, कृष्णात शेडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. चरेगावकर पुढे म्हणाले, अंगापूर गावाला आदर्श परंपरा व संस्कृती आहे. या गावाने अनेकांना पाठबळ दिले, मात्र त्यांनी केवळ राजकीय स्वार्थ साधला आणि गावाला विकासकामांपासून वंचित ठेवले. भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही प्रत्येक वाडी वस्तीचा आणि गावांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. केवळ घोषणा न करता शाश्वत विकास, यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. अंगापूरमध्ये आज दहा कोटी 13 लाख रुपयांची विकासकामे होत आहे, जे आजवर कधी झाले नाही, ते आज होत आहे, ग्रामस्थांनी दर्जेदार विकासकामे होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
महेश शिंदे म्हणाले की, नारळवाल्या बाबाने अंगापूरचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला. केवळ तोंडे बघून काम करण्याच्या पध्दतीमुळे सामान्य नागरिकांवर मोठा अन्याय झाला आहे. सामान्य जनता वेठीस धरुन राजकारण करणार्यांना जनतेनेच घरी बसवले असून, भाजपला सत्तेवर आणले आहे. नारळवाल्या बाबाला आता नारळ देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, अर्थ मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगलताई घोरपडे यांच्या निधीतून व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या सहकार्यातून सुमारे 10 कोटी 13 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (7 कोटी 50 लाख रुपये), मुख्यमंत्री पेयजल योजना टप्पा क्र. 2 (1 कोटी 25 लाख रुपये), अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारे, पेव्हर्स व गावातील विविध मंदिरांचा विकास, बाजार पटांगण संरक्षक भींत, अंगलाई मंदिर संरक्षक भींत, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, (90 लाख रुपये), दलित वस्ती सुधार योजनेतून साकव पूल (35 लाख रुपये), मारुती मंदीर सभामंडप (7 लाख रुपये), अंगलाईनगर व्यायामशाळा (6 लाख रुपये) आदी विकासकामे होत आहेत. मनोजदादा घोरपडे यांच्यासह घोरपडे परिवाराने या विभागावर पूत्रवत प्रेम केले असून, वर्णे जिल्हा परिषद गटातील सक्षम नेतृत्वामुळे आज जनतेचा विकास साधला जात असल्याचेही महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
मनोज घोरपडे म्हणाले की, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही ठोस विकास केली असून, युवकांसाठी रोजगार निर्मितीवर भर दिला आहे. जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात ठोस विकासकामे करण्यावर आमचा भर आहे.
सरपंच सुरेश (बाबा) कणसे यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, बबनराव कणसे, आप्पासाहेब कणसे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कणसे, अरुण कणसे, वर्णेचे माजी सरपंच रमेश पवार, फडतरवाडीचे सरपंच दत्तात्रय मोरे, दिलीपसिंह कणसे, संगीता कणसे, शिल्पा कणसे, मानसिंग मांडवे, किरण पवार, रफिक शेख, राजू माने यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |