RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

23 July 2019 at 01:22

तालुक्यातील महिलांची जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मेढा : गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती. परंतु जावळीत दारूबंदी असतानासुद्धा देखील काही मुजोर झालेले गुंड प्रवृत्तीची लोकं राजरोसपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री करतात दारुमुळे तालुक्यात अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडून केवळ बेकायदेशीर दारू विक्रेत्यांच्या कामगारांवर कारवाई होत आहे. या कारवाईमध्ये दारूविक्री करणाऱ्या बरोबरच मूळ मालकावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जयश्री पवार, वनिता फरांदे, सुनंदा भिलारे, सौ.फरांदे यांसह महिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

मेढा येथे सीसीटीव्ही व साऊंड सिस्टिम कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पोलीसप्रमुख आले होते यावेळी निवेदन सादर करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना यांना दिलेल्या निवदेनात असे नमूद केले आहे की, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडाळ, सोमर्डी, शेते, करहर, सरताळे मातंग वस्ती तसेच सरताळे पाचवड रोडवरील एका धाब्यावर सायगाव व आनेवाडी परिसरात बेकायदेशीर दारूविक्री जोमाने सुरू आहे. तसेच सरताळे येथी मातंग वस्तीमध्ये बेकायदेशीर दारू व मटका जुगार यासारखे अवैद्य धंदे चालतात तरी कसे ? तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात दारू येते तरी कुठून ? मेढा, करहर, कुडाळ, सायगाव, केळघर, सरताळे, सोमर्डी  इत्यादी तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेच्या गावांमधून तसेच धाब्यांवर दारू बिनधास्तपणे विक्री केली जाते यावर कायमचा उपाय करावा अशी विनंती जावळी तालुक्यातील महिलांनी केली अनेक वेळा जिल्हा पोलीस प्रमुख सह जिल्हाधिकाऱ्यांना व उत्पादन शुल्क विभागाला निवेदने देऊनही तालुक्यातली अवैद्य दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद होत नाहीत त्यामुळे आता महिला एक दिवस रस्त्यावर बसून आंदोलन करणार असा इशाराही जयश्री पवार यांनी दिला जावळीतील कुडाळ, सरताळे, सोमर्डी, हुमगाव, करहर, केळघर, मेढा, सायगाव, अनेवाडी येथील सुरू असणारे बेकायदेशीर दारू धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई करून हे बेकायदेशीर दारू धंदे कायमचे बंद करून जे खऱ्या अर्थाने दारू विकतात त्यांच्या कामगारांसह दारूविक्री मालकावर गुन्हे दाखल करून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी शिवसेनेच्या जावळी तालुका महिला संघटक जयश्री पवार यांनी केली आहे.

 

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before

खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना दि.२६ ते ३१ आँगस्ट कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात क्रांतीज्योती अंतर्गत महिला सदस्यांना दि.२६ ते २८ आणि पुरुष सदस्यांना दि.२८ ते ३१ आँगस्ट या

13 hours before