सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारालगत शेंद्रे गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री नउ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकीची सातारा पोलिस व्हॅनला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात विकी महेंद्र वाघमारे (वय 26, रा.भक्तवडी ता.कोरेगाव) हा युवक ठार झाला. दरम्यान, पोलिस व्हॅनला धडक झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मृत युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री नउ वाजण्याच्या सुमारास विकी वाघमारे हा टीव्हीएस एमएच 11 सीके 6942 या दुचाकीवर धनंजय जाधव याच्यासमवेत निघाला होता. विकी वाघमारे हा दुचाकी चालवत होता तर धनंजय पाठीमागे बसलेला होता. रात्री नउ वाजण्याच्या सुमारा दुचाकी शेंद्रे गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यावेळी पुढे निघालेल्या एमएच 11 एबी 8236 या पोलि व्हॅनला धडक बसली. ही धडक एवढ्या जोरात होती की दुचाकी पुन्हा उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघाता विकी व धनंजय दोघे गंभीर जखमी झाले.
पोलिस व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याने घटनास्थळाकडे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर यातील विकी वाघमारे हा मृत झाला असल्याचे रुग्णालयीन सूत्राांनी सांगितले. तोपर्यंत दोघांच्या नातेवाईकांना अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व्हॅन व दुचाकी धडकेत युवक ठार झाल्याने पोलिसांमध्येही खळबळ उडाली.
तालुका पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेवून पंचनामा केला. फौजदार एस.बी.जाधव यांनी मृत विकी वाघमारे याच्याविरुध्द वाहन चालवण्याचा परवाना नसताना हयगय करुन वाहन चालवून स्वत: च्या मृत्यूस जबाबदार ठरुन एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |