सातारा : महाराष्ट्र राज्यातील जाहिरात एजन्सीजची शिखरसंघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऍडव्हर्टायझिंग ऍन्ड मार्केटिंग आंत्रा प्रिन्यूअर्स -फेम च्या अध्यक्षपदी नाशिक येथील पिंगळे पब्लिसिटिचे संचालक मोतीराम पिंगळे यांची व सचिवपदी पुणे येथील मोना ऍडस्चे संचालक डॉ. राहुल शिलेदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
फेम ही महाराष्ट्रातील जाहिरात एजन्सीजची संघटना आहे. फेमची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष अमरदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पुणे येथे संपन्न झाली. यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, पुणे, धुळे, जळगाव आदी शहरातील सभासद उपस्थित होते. सभासदांच्या विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. अमरदीप पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा सादर केला. खजिनदार मोहन कुलकर्णी यांनी खर्चाचा ताळेबंद सादर केला, तर कार्यवाह संदीप झवेरी यांनी इतिवृत्त सादर केले.
नूतन अध्यक्ष पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ङ्गेमची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामधे सचिव राहुल शिलेदार (पुणे), सह सचिव प्रशांत कुलकर्णी (सांगली), खजिनदार मोहन कुलकर्णी (कोल्हापूर), उपाध्यक्ष विनीत कुबेर (पुणे), उपाध्यक्ष सुनील बुधवानी (नागपूर), कौस्तुभ नाबर (कोल्हापूर), किशोर गांधी (अहमदनगर), अजिंक्य उजळम्बकर (औरंगाबाद), प्रसिद्धीप्रमुख दिलीप निकम (नाशिक), डेव्हलपमेंट कमिटी अध्यक्ष सुभाष शेळके (औरंगाबाद), कार्यकारिणी संचालक संजीव चिपळूणकर (कोल्हापूर), अंकात मांढरे (अहमदनगर), राजेश भांडोरे (जळगाव), रामदेव व्यास (औरंगाबाद ), महेश कराडकर (सांगली), राहुल देशपांडे (सातारा), विकास रायभाने (औरंगाबाद), तज्ञसंचालक अमरदीप पाटील (कोल्हापूर), संदीप झवेरी (सोलापूर) यांचा समावेश आहे.
यावेळी डिजिटल मार्केटिंग या विषयावर तज्ञ मनोज कोटक व जाहिरात क्षेत्रातील नवीन संधी या विषयावर ऋग्वेद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या गरजांनुसार जाहिरातदारांनी बदल करून व्यवसायवृध्दी करावी, वृत्तपत्रांचे महत्व अबाधित राहण्यासाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, असे नूतन अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांनी सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |