फलटण : मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.आज फलटण शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून व्यापार, विक्रेते, व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवसाय बंद ठेवत मराठा आरक्षणाच्या बंदला पाठिंबा दिला.
मराठा समाज आरक्षणासाठी आज पूर्ण बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व व्यवहार आज पूर्ण बंद होते. एकही दूकान चालु नव्हते, मराठा समाजातील अनेक युवक मोटार सायकल रैलीद्वारे शहरातून फिरूंन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयाची पूजा करून मराठा आंदोलनात शहीद झालेल्या सर्वाना श्रद्धांजली वाहन्यात आली. यावेळी सयोजकांच्या वतीने उपस्थितांना शांततेत आंदोलन करण्याची शपथ देण्यात आली. यानंतर छ. शिवाजी महाराज पूतळयासमोरील चौकात काही वेळ शातंतेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे फलटण मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता.
आजच्या बंदच्या प्राश्वभुमीवर पोलिस प्रशासनाने शहर व ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था न बिघडण्याची खबरदारी घेतली. तालुक्यातील पेट्रोलपंप, शाळा, कॉलेजेस व जिवनावश्यक वस्तूंच्या विक्री करणारी दुकाने बंद असल्यामुळे अनेकांची मात्र गैरसोय झाली . सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला.
तालुक्याच्या पूर्व भागासह साखरवाडीत कडकडीत बंद
मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी आयोजित महाराष्ट्र बंदला फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी आसू खटकेवस्ती राजाळे साठे पवारवाडी जाधववाडी हणमंतवाडी, गुणवरे आदी भागात ठिकठिकाणी कडकडीत बंद बंदला मोठा प्रतिसाद प्राथमिक माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर काॅलेज, सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा आयोजित महाराष्ट्र बंदला पाठींबा देऊन बंद मध्ये सहभागी घेतला.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठे गाव असलेल्या साखरवाडीत आज मराठा आंदोलना दरम्यान शंभर टक्के बंद पाळण्यात आला होता.गावातील साखर कारखान्यातील कामगारांनी आज काम बंद ठेवून आपला पाठिंबा या आंदोलनाला दर्शविला. साखरवाडीतील सर्व शाळा, कॉलेज, औषध दुकाने, खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आली होती. फलटण तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने फलटण तालुक्यात शांततेच्या मार्गाने बंद पाळण्याचे आवाहनस करण्यात आले होते. त्याचप्रमाणे साखरवाडीतील मराठा बांधवांनीही अतिशय शांततेत आज साखरवाडी बंद ठेवून आंदोलन केले. साखरवाडीतील दोन्ही पेट्रोलपंप बंद असल्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली होती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |