RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

खा. उदयनराजेंचे तळ्यात मळ्यात

10 September 2019 at 04:03

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सध्यातरी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय

सातारा :  सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार, या चर्चांना तुर्तास तरी ब्रेक लागलेला आहे. काल दि. 9 रोजी पुण्यात झालेल्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत खा. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाला विरोध दर्शविल्यामुळे सध्यातरी उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, उदयनराजेंच्या तळ्यात मळ्यातल्या भूमिकेमुळे सातार्‍यात राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा व लोकसभा मतदारसंघातही या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला देशात आणि राज्यात निर्भेळ यश मिळाले. महाराष्ट्रात येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय करिअर संपुष्टात येवू नये, या भीतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गजांनी भाजप-शिवसेनेची वाट चोखाळलेली आहे. यामध्ये सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रराजेंनीही पक्षांतराचा गमजा गळ्यात घालून भाजपात प्रवेश मिळवला. शिवेंद्रराजेंच्या प्रवेशामुळे उदयनराजेही भाजपात जाणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडत होत्या. तारखाही ठरल्या. परंतू कार्यकर्त्यांच्या कौलाशिवाय मुहूर्त ठरवणार नाही, अशी भूमिका खा. उदयनराजेंनी घेतल्यामुळे काल सकाळपर्यंत सस्पेन्स निर्माण झाला होता. काल सकाळी खा. उदयनराजेंनी पुणे येथील निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेवून पक्षांतराबाबत चर्चा केली. मात्र बिनीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतच रहा, असा सूर आळवल्यामुळे उदयनराजेंनीही हा कौल मान्य करीत सध्यातरी सबुरीने घ्यायला हवे, असा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी फेम अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी खा. उदयनराजेंची सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेवून भाजप प्रवेश करु नका, अशी विनंती केली होती. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी अटकळही बांधली जात होती. मात्र उदयनराजे भाजपात गेल्यास होणार्‍या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना दगाफटका होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे कार्यकर्त्यांनी ताकही फुंकून पिण्याचा सल्ला खा. उदयनराजेंना दिला असल्याचे वृत्त आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील राजकारणावर मांड ठेवण्यासाठी उदयनराजेंना भाजप शिवाय पर्याय नाही, अशा चर्चाही जिल्ह्यात सुरु आहेत.

 

 

नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

32 minutes before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

13 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

14 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

13 hours before