RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

फलटणमध्ये सासर्‍याकडून सुनेचा खून

12 August 2019 at 16:35

सातारा : जाधववाडी, ता. फलटण येथे जेवताना शिवीगाळीच्या रागातून पारधी समाजातील संशयित आरोपीने सुनेचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना काल दि. 11 रोजी रात्री आठच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहराशेजारील उपनगर असलेल्या जाधववाडी येथे पवार कुटूंब वास्तव्यास आहे. काल दि. 11 रोजी रात्री आठच्या दरम्यान आम्रपाली शाम पवार (वय 23) हिचा संशयित आरोपी चांडवल झबझब पवार (वय 50) याने जेवणावेळी झालेल्या वादातून व शिवीगाळीतून चिडून जावून चाकुसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केला. दरम्यान, नातेवाईकांनी संशयित आरोपीस लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे तोही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कविता चांडवल पवार (वय 45) हिने फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी मयत व इतर नातेवाईकांवर भादंवि 307 अन्वये परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. खून प्रकरणी संशयित असलेल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतचा अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोमण करीत आहेत.
atul ghorpade


जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

1 hour before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before

खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना दि.२६ ते ३१ आँगस्ट कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात क्रांतीज्योती अंतर्गत महिला सदस्यांना दि.२६ ते २८ आणि पुरुष सदस्यांना दि.२८ ते ३१ आँगस्ट या

13 hours before