05:48pm | Mar 10, 2018 |
सातारा : कब्रस्तानाच्या अंतर्गंत रस्त्यांचे आणि संरक्षक भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे करा. दर्जामध्ये कोणतीही तडजोड चालणार नाही. सुविधा नेहमीच चांगल्या दिल्या गेल्या पाहीजेत अशा सूचना करतानाच, आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गेंडामाळ कब्रस्तानातील अंतर्गत रस्त्याच्या कामांचा आणि संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ केला.
आम्ही जो शब्द देतो तो अपूर्ण न राहील याची नेहमीच दक्षता घेत असतो. काही दिवसापूर्वी कब्रस्तानातील संरक्षक भिंतीचा आणि अंतर्गंत रस्त्यांच्या कामाबाबत तत्कालीन नियोजन सभापती व विद्यमान नगरसेवक अल्लाद्यीन शेख यांनी मागणी केली होती. त्याचवेळी नगरपरिषदेच्या निधीतून गेडामाळ कब्रस्तानातील सुमारे 27 लाखांची कामे हाती घेण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला आम्ही दिल्या होत्या. त्या नुसार आज कामाची सुरुवात होत आहे याचे आम्हाला समाधान आहे असे नमुद करत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे सांगीतले की, साता-यातील मुस्लीम समाज नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहीला आहे. साता-यात सामाजिक सलोखा राखण्यात सर्वच समाजाचे योगदान असल्यामुळे कोणताही दुजाभाव साता-यात आढळुन येत नाही ही सातारची खरी ओळख आहे.
महाराजसाहेब कधीच कुणाला अंतर देत नाहीत. त्यांच्या सक्त सूचनांमुळेच आज कब्रस्तानातील प्रलंबीत कामे मार्गी लागली आहेत, मुस्लीम समाजावर उदयन महाराजसाहेबांचे असलेले प्रेम आणि उदयन महाराजसाहेबांवर मुस्लीम समाजाची असलेली अतुट निष्ठा म्हणूनच इतक्या मोठया प्रमाणांत सुमारे27 लाख रुपयांच्या कामांना सुरुवात होत आहे असे मत नगरसेवक अल्लाउद्यीन शेख यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत अंतर्गंत रस्त्यांच्या कामाची सुरुवात श्रीफळ वाढवून मुस्लीम समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी नजीर खान, इम्तीयाज सयद,मन्सुर खान, मॉन्टी बागवान, युसूफ शेख,मुक्तार पालकर, माजी नगरसेवक इंन्तेखॉब बागवान,इरफान बागवान, रफिकशेठ बागवान, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य ईर्षादभाई बागवान,सलीम कच्छी, नगरसेवक शकील बागवान यांच्यासह मुस्तील समाजतील बहुसंख्य व्यक्ती उपस्थित होत्या.
दरम्यान, गेंडामाळ कब्रस्तान मदरश्यामधील लहान मुलांनी, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस, केक कापून साजरा केला. यावेळी मदरश्यामधील मुलांबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हितगुज केले, मुलांनी चागले कार्यात कधीही खंड पाडायचा नाही असा उपयुक्त सल्लाही खासदारांनी यावेळी मुलांना दिला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |