05:40pm | Dec 05, 2019 |
सातारा : सातारा जिल्हा कारागृहामध्ये बुधवारी पहाटे एका अज्ञाताने कारागृहाच्या बाहेरुन कागदाचे पार्सल फेकले. या पार्सलमध्ये चायनीज राईस, कटर व एक चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिठ्ठीमध्ये 'बबा, १२/१३ रोजी काम झाले पाहिजे', असा मजकूर आढळला असून त्यावर इंग्रजी टीजी लिहलेले आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास ज्ञानू भिलारे (वय ४९) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते कारागृह पोलिस हवालदार आहेत. मंगळवारी सायंकाळपासून तक्रारदार यांच्यासह इतर कारागृह पोलिस जेलमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पत्र्यावर काहीतरी आदळल्याचा आवाज आला. पोलिसांनी जावून पाहिले असता सर्कल नंबर २ वरील पत्र्यावर काहीतरी संशयास्पद पडल्याचे दिसले. ते पार्सल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये चायनीज राईस होता तसेच धारदार कटर व एक चिठ्ठी आढळली. पोलिसांनी चिठ्ठी उघडून वाचल्यानंतर तेही हादरुन गेले.
पोलिसांनी ते सर्व साहित्य ताब्यात घेवून वरिष्ठांना त्याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सापडलेली चिठ्ठी वाचली असता त्यामध्ये बाबा नामक व्यक्तीला मेसेज होता. यामुळे त्या बरॅकमधील बाबा कोण? १३ किंवा १२ ला कोणते काम झाले पाहिजे? टी जी या इंग्रजी अक्षराचा अर्थ काय? कोणती गंभीर घटना घडणार आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |