03:36pm | Apr 23, 2018 |
सातारा : सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याला वरदान ठरणारे वांग-मराठवाडी धरणाच्या अनुषंगाने, आज शासनाने उमरकांचन आणि मेंढ या पूर्णतः बुडीत क्षेत्रातील दोन गावांच्या एकूण 86 धरणग्रस्तांचे 100 टक्के पूनर्वसन केले आहे. त्यासाठी 46 कोटी रुपयांचे वाटप देखील केले आहे. सिंचनाच्या सुविधेसाठी शासनाने हे पाउल उशिरा जरी उचललेले असले तरी ते स्वागतार्ह आहे, पुनर्वसनाचा प्रश्न निकालात काढल्याने, राज्य शासन अभिनंदनास पात्र आहे. याकामी पाटणचे राज्य विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु तथा आमदार शंभुराज देसाई तसेच विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांचीही मोलाची साथ सरकारला लाभली आहे असे गौरवोद्गार सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहेत.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, ज्या ठिकाणी पाणी अडवणे शकय आहे त्या ठिकाणी ते अडवले जावून, सिंचनासाठी उपयोगात आणले गेले पाहीजे अशी भुमिका आमची प्रथमपासूनच आहे. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यास,शेतकरी सक्षम होईलच तथापि राज्यातील जमिन सुजलाम-सुफलाम होण्यास गती मिळेल याच भावनेतुन, आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असल्यापासून सातत्याने जनतेच्या हितासाठी प्रयत्नशील राहीलो आहे. धरणाची उभारणी करताना, पुनर्वसनाचा प्रश्न सकारात्मकतेने हाताळण्याची गरज असते. नियमावर बोट ठेवून, विकासाची अंमलबजावणी सर्वथा शक्य नसते या धोरणातुन आम्ही सिंचन व्यवस्थापन झाले पाहीजे अशी वेळोवेळी मागणी करीत आलो आहोत. त्याकरीता पूर्वी शासनाचे आधी धरण मग पुनर्वसन असे धोरण होते तर धरणग्रस्तांची मागणी आधी मरण मग धरण अशी होती. त्यावेळी उरमोडी धरणग्रस्तांचे आधी पुनर्वसन आणि मग धरण असे धोरण आम्ही आखुन त्यानुसार कार्यवाही करण्यात आली होती अशी आठवणही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केली आहे.
आज पाटण तालुक्याला वरदान ठरणा-या वांग-मराठवाडी धरण प्रकल्पाच्या उमरकांचन आणि मेंढ या गावातील 86 खोतदारांकरीता शासनाने 46 कोटी रुपयांचे वाटप केले आहे हे निश्चितच देरसे आये लेकिन दुरुस्त आए या उक्तीनुसार आहे. पूर्णतः बुडीतक्षेत्रातील 100 टक्के पूनर्वसन केल्याबद्दल शासन अभिनंदनास पात्र आहे. आम्ही राज्य शासनाचे तसेच वांग मराठवाडी प्रकल्प हाताळणा-या व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाचे अभिनंदन करतो, तथापि या धरणाने बाधित असलेल्या अन्य गावांतील खातेदारांचेही लवकरात लवकर पूनर्वसनाचे प्रश्न निकाली निघतील अशी अपेक्षा आहे, आमचे त्यादृष्टीने बारीक लक्ष राहणार आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |