महाबळेश्वर : युनियन बॅकेच्या गल्लीत असलेल्या गोकुळ लॉज मध्ये कारभारी भाऊसाहेब आवारी, (वय 54) रा. 202, दत्तशांती बिल्डींग, नेताजी नगर, गणपती मंदीरा जवळ, पिंपळे गुरव, औंध कॅम्प, पुणे यांनी मफलरच्या मदतीने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली. काल रात्री दहा वाजता ही घटना उघडकीस आली असून, याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे येथील व्यवसायिक कारभारी आवारी हे सकाळी सात वाजता जॉगिंगसाठी घराबाहेर पडले यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक मफलर व पाण्याची बाटली सोबत घेतली होती. दुपारपर्यंत ते घरी न आल्याने त्यांचे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान कारभारी आवारी हे पुणे येथुन थेट महाबळेश्वर येथे आले दुपारी 4 वाजता ते बस स्थानकापासुन जवळच असलेल्या गोकुळ लॉजमध्ये गेले तेथे त्यांनी मी काही कामा निमित्त येथे आलो होतो मी रात्री पुन्हा जाणार आहे. तोपर्यंत थोडी विश्रांती हवी आहे फ्रेश झाल्या नंतर मी तुमची खोली खाली करून जाणार आहे. असे सांगून खोली घेतली. बराच वेळ ते रूमच्या बाहेर न आल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी खोलीचे दार वाजविले परंतु आतुन काही आवाज आला नाही. म्हणुन त्यांनी खोलीच्या खिडकीतुन आत डोकावुन पाहीले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळुन आले. हॉटेल मालकांनी तातडीने याबाबत पोलिसांनी खबर दिली, याबाबत स.पो.नि बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भुजंगराव काळे हे पुढील तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |