फलटण : 'टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगे। देवजीच्या द्वारी आज रंगला अभंग॥
भगव्या पताका उंचवित ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष व अभंगांच्या भक्तिरसात बुडालेल्या लाखो वैष्णवांच्या व उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील तरडगाव, चांदोबाचा लिंब येथील माळावर भक्तिमय वातावरणात रंगले.
माउलींच्या चोपदाराने चोप उंचावून उभ्या रिंगणाची सूचना देताच पालखी स्थळापुढील दिंड्यांनी दोन रांगा करून परंपरागत पद्धतीने उभे रिंगण तयार केले. रस्त्याच्याकडेला असलेल्या वडांच्या झाडांच्या पारंब्याची जागा वारकरी मंडळी उपस्थित भक्तगणांनी घेतली. रिंगणाभोवती दिंड्यातील वारकर्यांनी टाळमृदंगाच्या गजराने ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. माउलीच्या गजराने आसमंत दणाणून सोडला होता.
एवढ्यात चोपदारांनी पुन्हा आपल्या हातातील चोप उंचावला आणि क्षणात शांतता निर्माण झाली सर्व भक्तगण आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहात होते तो क्षण आला. एवढ्यात दोन्ही अश्वांनी रथापुढील दिंड्या रिंगणातून पळत जाऊन रथातील माउलीच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखी सोहळा प्रमुखांनी अश्वांना पुष्पहार घातला. त्यानंतर माउलीचा अश्व पुढे व स्वारांचा अश्व मागे अशी दौड पूर्ण झाली. त्यानंतर पुन्हा सर्वत्र ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष सर्वत्र सुरू झाला. अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली होती. सोहळ्यातील या पहिल्या रिंगणामुळे सर्व भक्तांमध्ये उत्साह संचारला होता. दिंड्यातील वारकरी विविध प्रकारचे खेळ खेळत आपला आनंद द्विगुणित करीत होते. महिला वर्ग झुमा-फुगडी खेळत होते. विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती सुमने उधळीत उत्साही वातावरणात चांदोबाचा लिंब येथील रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.
पहिले उभे रिंगण संपल्यानंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. तरडगावच्या प्रवेशद्वारावर गामपंचायतीच्या वतीने माउलींचे परंपरागत पद्धतीने स्वागत करण्यात आले. गावच्या वेशीवरून तळापर्यंत पालखी शिस्तबद्ध रितीने खांद्यावर नेण्यात आली. आळंदी ते पंढरपूर मार्गावर फक्त तरडगावमध्येच पालखी रथावरून काढून खांद्यावर घेण्यात येऊन गावामध्ये मिरवणूक निघते. माउलीच्या स्वागतासाठी गावामध्ये स्वागतकमानी उभारून घरासमोर पालखी मार्गावर सडारांगोळी घालून वातावरण भक्तिमय करण्यात आले होते. सायंकाळी पालखी सोहळा तळावर आल्यावर एक दिवसाच्या मुक्कामासाठी वैष्णवांचा मेळावा तरडगाव गावी विसावला हा पालखी सोहळा रविवार दिनांक 15 रोजी फलटणला मार्गस्थ होणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे लोणंद येथील दीड दिवसांच्या मुक्कामानंतर आज दुपारी 2 वाजता फलटण तालुक्यातील हद्दीच्या सीमेवर सदरेच्या ओढ्यावर आगमन झाले. फलटण तालुक्याच्या वतीने माउलीच्या पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजीवाराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी पं. स. सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, विविध संस्थाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणंद-फलटण सीमेवर पालखी सोहळ्याला खंडाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. लोणंद तरडगावदरम्यान, 7 कि.मी. अंतरावरील पालखी सोहळ्याच्या प्रवासात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने माखलेले रस्ते, भजन, कीर्तन, प्रवचनात रंगलेले वारकरी भगव्या पताका घेऊन मृदंगाच्या गजरात ध्वनी पडणारा ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम, या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सहकुटुंब चांदोबाचा लिंब येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या उभ्या रिंगणाचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील जातीने लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |